'या' ठिकाणी महिलांच्या सेक्सुअल पार्टनरची संख्या आहे अधिक; सर्व्हेक्षणात मोठा खुलासा

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS) मध्ये ही माहिती समोर आली आहे. 

Updated: Aug 20, 2022, 01:11 PM IST
'या' ठिकाणी महिलांच्या सेक्सुअल पार्टनरची संख्या आहे अधिक; सर्व्हेक्षणात मोठा खुलासा title=

मुंबई : शहरापेक्षा गावांमध्ये महिलांचे सेक्सुअल पार्टनर जास्त असल्याचं समोर आलं आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS) मध्ये ही माहिती समोर आली आहे. या सर्वेक्षणात 2019-21 या कालावधीतील डेटाची नोंद करण्यात आली आहे. या सर्वेक्षणात असं सांगण्यात आलंय की, शहरी महिलांना त्यांच्या आयुष्यात सरासरी 1.5 सेक्सुअल पार्टनर असतात. तर ग्रामीण महिलांमध्ये सरासरी 1.8 पेक्षा जास्त सेक्सुअल पार्टनर असल्याचं समोर आलंय.

सर्वेक्षणानुसार, पुरुषांच्या सरासरी 1.7 च्या तुलनेत महिलांमध्ये सरासरी 1.5 सेक्सुअल पार्टनर असतात. या सर्व्हेक्षणात विधवा, घटस्फोटीत किंवा कधीही विवाहित नसलेल्या गावातील महिलांचाही सहभाग केला गेला होता. 

या महिलांच्या म्हणण्यानुसार, 12 महिन्यांत त्यांनी दोन किंवा अधिक लोकांसोबत लैंगिक संबंध ठेवलेत. डेटामध्ये असंही सांगण्यात आलंय की, 3.6% पुरुष, 0.5% महिलांच्या तुलनेत अशा व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवलेत, जे त्यांचा जीवनसाथी नव्हता किंवा एका वर्षापासून त्यांच्यासोबत रिलेशनशिपमध्येही नव्हते.

यासोबतच सेक्सुअल पार्टनरच्या बाबतीत ग्रामीण महिला शहरी महिलांच्या तुलनेत पुढे असल्याचं या सर्वेक्षणात आढळून आलंय. ग्रामीण महिलांचे सरासरी 1.8 पार्टनर्सशी संबंध होते, तर शहरी महिला या बाबतीत थोड्या मागे आहेत. शहरी महिलांना सरासरी 1.5 पार्टनर्स होते.

पुरुषांबद्दल बोलायचं झालं तर ग्रामीण पुरुषांचे सरासरी 2.3 पार्टनर्सशी संबंध आहेत, तर शहरी पुरुषांचे 1.7 पार्टनरशी संबंध आहेत.