सोशल मीडियावर या महिला डॉक्टरची जोरदार चर्चा, तिने असं काही केलं की...

सध्या सोशल मीडियावर महिला डॉक्टरची (Women Doctor) जोरदार चर्चा होत आहे.  

Updated: Jan 1, 2021, 01:40 PM IST
सोशल मीडियावर या महिला डॉक्टरची जोरदार चर्चा, तिने असं काही केलं की...

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एका महिला डॉक्टरची (Women Doctor) जोरदार चर्चा होत आहे. तिचा एक फोटा जोरदार व्हायरल होत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. दोन नवजात मुलींसह (Twins Girls)  या महिला डॉक्टर दिसत आहेत. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. या महिला डॉक्टर अविवाहीत आहेत. त्यांनी केलेले कामही कौतुकास पात्र आहे.

त्याच असं झालं की, एका महिलेले जुळ्या मुलींना रुग्णालयात जन्म दिला. त्यानंतर त्या दोन्ही जुळ्यांच्या आईने त्यांना सोडून (Mother Rejected Her Twins Girls ) दिले आणि ती रुग्णालयातून घरी गेली. या मुलींचा सांभाळ कोण करणार, असा प्रश्न होता. मात्र, या जुळ्या मुलींवर उपचार करणाऱ्या अविवाहित महिला डॉक्टर कोमल यादव यांनी त्यांना आपलेसे केले.(Women Doctor Adopt Twins Girls After Rejected Mother) रुग्णालय प्रशासनाने त्यांना खूप समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या आपल्या मतावर ठाम राहिल्या.

फर्रुखाबाद येथे डॉ. कोमल यादव या एका रुग्णालयात काम करत आहेत. यावेळी त्यांना एका वेगळ्याच प्रसंगाला सामोरे जावे लागले. जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर त्यांची माता त्यांना टाकून निघून गेली. त्यानंतर डॉ. कोमल यांनी सर्व औपचारिकता पूर्ण करुन दोन्ही मुलींना दत्तक घेतले. या त्यांच्या कामगिरीमुळे आयएएस अधिकारी अवनिष शरण यांनी त्यांचे कौतुक केले आहे. त्यांनी त्याबाबत ट्विट करत फोटोही शेअर केला आहे. त्यांतर ही पोस्ट अधिक व्हायरल होत आहे. ट्विटवर डॉ. कोमल यांचे कौतुक होत आहे. प्रेरणादायी गोष्टीबद्दल त्यांना धन्यवाद देण्यात येत आहेत.