मुलाखतीत मुलींना विचारण्यात येतात 'असे' प्रश्न

प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 19, 2017, 01:13 PM IST
मुलाखतीत मुलींना विचारण्यात येतात 'असे' प्रश्न  title=
Representative Image

नवी दिल्ली : प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पहायला मिळत आहे.

प्रत्येक क्षेत्रात महिला आपली  गुणवत्ता सिध्द करत आहेत. मात्र, एका सर्व्हेक्षणात एक विचित्र गोष्ट समोर आली आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरीसाठी जाणाऱ्या महिलांना मुलाखतीत असे काही प्रश्न विचारले जातात ज्यांची उत्तरं देणं थोडसं कठीणचं होतं.

हाफिंग्टन पोस्टच्या एका रिपोर्टनुसार, मुलाखतीदरम्यान मुलींना किंवा महिलांना असे प्रश्न विचारले जातात जे मुलांना कधीच विचारले जात नाहीत.

द इंडिपेंडेंस, हाफिंग्टन पोस्ट आणि bustle डॉट कॉम यांनी एकत्रित मिळून प्रायव्हेट सेक्टरमध्ये वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या २०० महिलांवर एक सर्व्हेक्षण केलं. यापैकी जवळपास ७५ टक्के महिलांना अशा प्रश्नांचा सामना करावा लागल्याचं समोर आलं आहे.

सर्व्हेक्षणानुसार, मुलाखतीदरम्यान या महिलांना त्यांच्या खासगी आयुष्याबाबत आणि नात्यांच्या संदर्भात प्रश्न विचारले गेले. पाहूयात काय होते हे प्रश्न...

प्रश्न क्रमांक १

तुमचं लग्न झालं आहे का?

अमेरिकन वेबसाईट bustle डॉट कॉमच्या मते, या प्रश्नाच्या आधारे मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला जाणून घ्यायचं असतं की ही महिला काम करण्यासाठी किती कन्फर्टेबल आहे. तसेच त्या महिलेला मुलं आहेत की नाहीयेत. रिपोर्टनुसार, लग्न झालेल्या महिला आपलं संपूर्ण लक्ष आणि क्षमतेने काम करु शकत नाही असं अनेक कंपन्यांना वाटतं. त्यामुळेच अशा प्रकारचे प्रश्न मुलाखतीत विचारण्यात येतात.

प्रश्न क्रमांक २

तुमचं फॅमिली प्लानिंग काय आहे?

सर्व्हेक्षणात एका महिलेने सांगितले की, तुमचं फॅमिली प्लानिंग काय आहे? असा प्रश्न मुलाखतीत मला विचारण्यात आला. जर तुम्हाला मुलं आहेत तर तुम्ही ऑफिस आणि मुलं यांच्यात ताळमेळ कसा राखाल? जर योग्य ताळमेळ राखता आला नाही तर कामावर परिणाम होईल असं मुलाखत घेणाऱ्याला वाटत असतं.

प्रश्न क्रमांक ३

तुमचं वय काय आहे?

bustle.comच्या मते, असे प्रश्न विचारण्या मागचं कारण म्हणजे त्यांना जाणून घ्यायचं असतं की महिला किती दिवस काम करु शकते. जर तिचं लग्न झालेलं असेल तर फॅमिली प्लानिंग कधी करणार. जर लग्न झालं नसेल तर लग्न कधी करणार.

प्रश्न क्रमांक ४

तुमच्या रिलेशनशिप संदर्भात सांगा

भारतामध्ये कमी पण परदेशांमध्ये अनेक मुलींना अशा प्रकारच्या प्रश्नांचा सामना करावा लागतो. ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका सर्व्हेक्षणानुसार, तेथे जवळपास २७ टक्के मुलींना हा प्रश्न विचारण्यात आला आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x