Israel- Hamas War : इस्रायल आणि हमास युद्धाचा भडका उडाला आहे. दिवसेंदिवस परिस्थिती भयानक होत चालली आहे. हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, हजारो लोक जखमी झाले आहेत. Israel- Hamas युद्धातील मन सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे. 1 महिन्याचे बाळ आईच्या मृतदेचे दूध पिताना सापडले आहे. दगडाचाही उर भरुन येईल असे हे दृष्य आहे.
या युद्धात 1,900 पॅलेस्टिनी ठार झाले असून 7हजार 696 जण जखमी झाल्याची माहिती हमासच्या मंत्रालयाने दिली आहे. तर 1,500 पॅलेस्टिनी दहशतवादी मारल्याचा दावा इस्त्रायने केला आहे.
जवळपास 20 लाख इतकी लोकसंख्या असलेल्या गाझाला स्मशानभूमिचे रुप आले. सर्वत्र मृतदेहांचा ढिगारा आणि जीव वाचवण्यासाठी धडपडणारे लोक असे दृष्य येथे पहायला मिळत आहे. ढिगारा हटवताना सैन्याला मन हेलावून टाकणारे दृष्य दिसले. एक महिन्याचे बाळ मृत आईचे दूध पिताना आढळून आले. हल्ल्यात इमारत जीमनदोस्त झाली. यात या बाळाच्या आईचा मृत्यू झाला. बाळ मात्र, आश्चकारकरित्या बचावले आहे. दुर्घटना घडली तेव्हा बाळ आईचे दूध पित होते. यामुळे आईच्या मृतदेहाशेजारीच हे बाळ आईचे दूध पिताना सापडले आहे.
क्रुरकर्मा हमासच्या अमानविय कृत्यानं कळस गाठलाय. हमासच्या दहशतवाद्यांनी एका चिमुकल्याला गोळ्या घालून ठार केलंय. एवढचं नाही तर या दहशतवाद्यांनी मुलाचा मृतदेह जाळून टाकलाय. इस्रायलच्या PMOनं हा फोटो जारी करत हमासच्या क्रुरतेचं दर्शन घडवून आणलंय.
इस्त्रायलमध्ये हमासने केलेल्या क्रुरकृत्यांचा व्हिडिओ समोर आलाय. हमासने एका जर्मन महिलेचं अपहरण केलं. या जर्मन महिलेला मारहाण करण्यात आली. तसंच कपडेही फाडल्याचा दावा इस्त्रायल मीडियाने केलाय. महिलेसोबत गैरवर्तवणूक केल्यानंतर तीला जबरदस्ती गाडीत बसवण्यात आलं.
इस्रायली सैन्य गाझा पट्टीत घुसलंय. ओलिसांची सुटका करण्यासाठी इस्रायली लष्कराने गाझामध्ये प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे हवाई हल्लेसुद्धा सुरु आहेत. उत्तर गाझा पट्टीमध्ये घुसून इस्रायली सैन्याने हमासचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. हमासने अँटी टँक मिसाईलने इस्रायली सैन्यावर हल्ला केला. त्याची थरारक दृश्य ड्रोन कॅमेरामध्ये चित्रित झाली आहेत. मात्र, इस्रायली हवाई दलाने पलटवार करत हमासचे अड्डे बेचिराख करुन टाकले.. उत्तर गाझा पट्टी सोडा असा अल्टिमेटम इस्रायलने कालच दिला होता. त्यासंदर्भातही पत्रकही विमानांमधून गाझा पट्टीत फेकण्यात आली होती.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
WI
(20 ov) 196/6
|
VS |
ENG
166(19 ov)
|
| West Indies beat England by 30 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
QAT
(20 ov) 215/5
|
VS |
BRN
164/7(20 ov)
|
| Qatar beat Bahrain by 51 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 182/6
|
VS |
IRE
115(16.5 ov)
|
| Australia beat Ireland by 67 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.