तुमच्या घरात 100 झुरळं आहेत का? मग ही कंपनी देईल तुम्हाला दीड लाख रुपये

हे थोडं विचित्र वाटेल, पण खरं आहे. जर तुम्हाला कंपनी 1.5 लाख रुपये देत असेल, तर तुम्ही झुरळांसोबत जगण्यास तयार आहात का? 

Updated: Jun 23, 2022, 12:58 PM IST
तुमच्या घरात 100 झुरळं आहेत का? मग ही कंपनी देईल तुम्हाला दीड लाख रुपये title=

Viral News: नवीन पेस्ट कंट्रोल पद्धतीची चाचणी घेण्यासाठी एक कंपनी लोकांना लखपती बनवण्याच्या तयारीत आहे. पण यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. तुम्हाला तुमच्या घरात 100 किंवा त्याहून अधिक झुरळं सोडावी लागतील. यूएस स्थित एका पेस्ट कंट्रोल कंपनीने हा योजना आखली आहे.  द पेस्ट इन्फॉर्मर, एक नॉर्थ कॅरोलिना-आधारित कंपनी, युनायटेड स्टेट्समधील घरमालकांना त्यांच्या घरात 100 झुरळे सोडण्याच्या बदल्यात $2,000 (सुमारे दीड लाख रुपये) देऊ करत आहेत. हे थोडं विचित्र वाटेल, पण ते अगदी खरं आहे. जर तुम्हाला कंपनी 1.5 लाख रुपये देत असेल, तर तुम्ही झुरळांसोबत जगण्यास तयार आहात का? 

युनायटेड स्टेट्समधील कीटक नियंत्रण कंपनीकडून अशी योजना आखण्यामागे कारण आहे. कंपनीला झुरळांचा प्रादुर्भाव घरांमध्ये कसा होतो? याची तपासणी करायची आहे. पेस्ट कंट्रोलरने त्यांच्या वेबसाइटवर प्रस्तावाचा तपशील पोस्ट केला आणि दावा केला की, झुरळे लोकांच्या घरी सोडण्याची योजना आखत आहेत. कंपनीला विशिष्ट कीटक नियंत्रण तंत्राची चाचणी घ्यायची आहे. घरमालकांना 30 दिवसांदरम्यान इतर कोणत्याही कीटक-नियंत्रण तंत्राचा वापर करण्याची परवानगी नसेल, असेही नमूद केले आहे.

नवीन पद्धतीमुळे 30 दिवसांच्या अखेरीस संसर्ग दूर झाला नाही तर, कंपनी आपल्या पोस्टमध्ये हमी देते की ती स्टँडर्ड पद्धत वापरली जाईल. या योजनेत सहभागी व्हायचं असल्यास तुमच्याकडे घर किंवा घरमालकाची लेखी मान्यता असावी. पात्र होण्यासाठी तुमचे वय 21 वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे. तुम्ही युनायटेड स्टेट्सचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

चाचणीनंतर जर झुरळांचा प्रादुर्भाव नाहीसा झाला नाही, तर कोणत्याही खर्चाशिवाय पारंपरिक झुरळ उपचार पर्याय वापरू शकता. या अभ्यासाचा कालावधी अंदाजे 30 दिवसांचा असेल.