21 व्या शतकातील 'बाबा वेंगा'ची भविष्यवाणी, प्रियंका चोप्राबाबत सांगितलेल्या या गोष्टी खऱ्या होणार?

प्रियंका चोप्राबद्दल हॅनाने काय भविष्यवाणी केले होती ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Updated: Oct 8, 2022, 06:33 PM IST
21 व्या शतकातील 'बाबा वेंगा'ची भविष्यवाणी, प्रियंका चोप्राबाबत सांगितलेल्या या गोष्टी खऱ्या होणार? title=
21st century Baba Vanga predictions will these things said about Priyanka Chopra nz

Hannah Carroll 2022 Predictions: ब्रिटीश राणीच्या मृत्यूबाबत अचूक भविष्यवाणी (Predictions) केल्यामुळे चर्चेत असलेली हॅना कॅरोल (Hannah Carroll) आजकाल खूप लोकप्रिय होत आहे. 19 वर्षीय हॅना कॅरोलला नवीन काळातील बाबा वायेंगा (baba vanga) असेही म्हटले जाते. बॉलीवूडसोबतच हॉलिवूडमध्ये नाव कमावणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राबद्दलही हन्नाने भविष्यवाणी केली होती. प्रियंका चोप्राबद्दल हॅनाने काय भविष्यवाणी केले होती ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (21st century Baba Vanga predictions will these things said about Priyanka Chopra nz)

आणखी वाचा - Parenting Tips : तुमच्या मुलांनी यशस्वी व्हावं असं वाटतंय ना.. मग फॉलो करा या टीप्स

 

21व्या शतकातील 'बाबा वेंगा'

हॅना कॅरोलने 2022 या वर्षासाठी 28 भविष्यवाण्या केल्या आहेत, ज्यापैकी बरेच खरे ठरले आहेत. यातील सर्वात मोठा अंदाज ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ II (Queen Elizabeth II) च्या मृत्यूबद्दल होता. 2022 च्या सुरुवातीला, हॅनाने राणी एलिझाबेथ II च्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती. तेव्हापासून त्यांना २१व्या शतकातील बाबा वेंगा असेही म्हटले जाते.

प्रियांका चोप्राबद्दलचा अंदाज

अमेरिकेतील (America) मॅसॅच्युसेट्स येथे राहणाऱ्या 19 वर्षीय हॅना कॅरोलने 2022 च्या सुरुवातीला प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्याविषयी भविष्यवाणी केली होती. प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस (Nick Jonas) या वर्षी आई-वडील होणार असल्याचे तिने सांगितले होते आणि तसेच घडले.

प्रियांका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनस सरोगसीद्वारे त्यांच्या पहिल्या मुलाचे पालक झाले. त्यांनी आपल्या मुलीचे नाव मालती ठेवले आहे. प्रियांका आणि निक त्यांची मुलगी मालतीसोबत क्वालिटी टाइम घालवत आहेत.

आता हॅनाचे इतर अंदाज खरे ठरतील की नाही याबद्दल लोक उत्सुक आहेत. या कामातून हन्ना दर महिन्याला सुमारे 1.5 लाख रुपये कमावते. हॅनाने स्वतः सांगितले आहे की ती भविष्यवाणीला तिचा व्यवसाय म्हणून पाहते.

आणखी वाचा - Instant Glow : दिवाळीत चेहरा उजळेल लख्ख.. घरच्या घरी करा हे दही फेशियल...

हॅनाला लोक त्यांचे फोटो पाठवतात आणि हॅना फोटो पाहून लोकांच्या करिअर, लग्न आणि इतर गोष्टींबद्दल अंदाज लावते. राणी एलिझाबेथ II च्या मृत्यू, पॉप गायिका रिहानाची (Rihana) गर्भधारणा, प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे पालक बनणे आणि किम कार्दशियनचे (Kim Kardashian) ब्रेकअप यासारख्या आधीच्या भविष्यवाणी  खऱ्या ठरल्या आहेत.