Electric bike video: इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

पण सध्या सोशल मीडियावर इलेक्ट्रिक बाइकचा (Electric bike) एक व्हिडीओ (video) तुफान व्हायरल होतो आहे.

Updated: Oct 8, 2022, 05:26 PM IST
Electric bike video: इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी title=
electric scooter fire video nmp

Electric bike video: गेल्या काही वर्षांपासून सतत इंधनच्या दरवाढीमुळे (Fuel price hike) वाहन चालकांचा कल हा इलेक्ट्रिक गाड्यांकडे वाढलेला दिसतं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी इलेक्ट्रिक गाड्या वापरण्यावर भर देण्यास सांगितला आहे. त्यामुळे प्रमुख शहरांमध्ये इलेक्ट्रिक गाड्या रस्त्यांवर धावताना दिसतं आहेत. अशात इलेक्ट्रिक गाड्या (Electric cars) चार्ज करण्यासाठी अनेक चार्जिंग स्टेशनही (Charging station) आपण पाहिले आहेत. 

पण सध्या सोशल मीडियावर इलेक्ट्रिक बाइकचा (Electric bike) एक व्हिडीओ (video) तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येतो. नुकताच तेलंगणातील सिकंदराबादमधील इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोरूमला आग (telangana many killed in fire at electric scooter showroom) लागली होती. या आगीत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असताना हा व्हिडीओ नेटकऱ्यांना निशब्द करत आहे. 

धक्कादायक व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका घरात इलेक्ट्रिक बाइक चार्ज करण्यासाठी ठेवण्यात आली आहे. काही वेळात अचानक या बाइकला आग लागते आणि क्षणात ती बाइक राख होते. 

हा व्हिडीओ ट्विटर Citizen 1 अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. शिवाय या व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, इलेक्ट्रिक बाइक मालकांनी चार्जिंग करताना काळजी घ्यायला हवी. त्याशिवाय या एक चेतावणी देखील देण्यात आली आहे की, इलेक्ट्रिक गाड्यांना लागलेली आग ही पाण्याने नियंत्रणात आणता येतं नाही.