अमेरिकेत कोरोनाचं थैमान सुरुच, २४ तासात आतापर्यंतचे सर्वात जास्त बळी

कोणत्याही देशात एकाच दिवसात मृत्यू होण्याची ही सर्वाधिक संख्या

Updated: Apr 16, 2020, 11:34 AM IST
अमेरिकेत कोरोनाचं थैमान सुरुच, २४ तासात आतापर्यंतचे सर्वात जास्त बळी title=

वॉशिंग्टन : अमेरिकेत गेल्या 24 तासात 2,600 लोकांना मृत्यू झालेला आहे. कोणत्याही देशात एकाच दिवसात मृत्यू होण्याची ही सर्वाधिक संख्या आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत मृतांचा आकडा 25000 च्या वर गेला आहे. इतर देशातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा ही संख्या जास्त आहे. एक दिवसात याआधी अमेरिकेत 2,569 लोकांना मृत्यू झाला होता.

अमेरिकेतील कोरोनामध्ये वाढत्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सामाजिक अंतर राखण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेत आतापर्यंत 6 लाखाहून अधिक कोरोना बाधित लोक आहेत तर मृतांचा आकडा 25 हजारांच्या पुढे गेला आहे.

जगात कोरोनामुळे अमेरिकेत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. दररोज येथे मोठ्या संख्येने नवीन रुग्ण आढळत आहेत. न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा सर्वाधिक परिणाम झाला असून मृतांची संख्याही सर्वाधिक आहे.

व्हाईट हाऊसमध्ये कोरोना विषाणूच्या स्थितीबद्दल पत्रकारांना संबोधित करताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "लढा सुरू आहे आणि आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की देशात वेगाने नवीन प्रकरणे समोर येत आहेत." असे दिसते की हे आणखी पुढे चालू राहील. त्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटनेविरूद्ध अमेरिकेचे कडकपणा कायम आहे. परवा अमेरिकेने वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा फंडा रोखला जाईल असे म्हटले होते. या निर्णयावर जगभर टीका होत आहे. संयुक्त राष्ट्रांनी असेही म्हटले आहे की अशा कठीण काळात निधी रोखणे अत्यंत धोकादायक सिद्ध होऊ शकते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x