कोरोना : भांडवलशाही देशांवर मंदीचे संकट, आर्थिक विकासदर वेगाने घसरला

कोरोनाच्या संकटाने अमेरिका, जपान, जर्मनी, ब्रिटन, इटली आदी भांडवलशाही देश धास्तावले आहेत.  

Updated: Apr 16, 2020, 10:41 AM IST
कोरोना : भांडवलशाही देशांवर मंदीचे संकट, आर्थिक विकासदर वेगाने घसरला title=

लंडन : कोरोनाच्या संकटाने अमेरिका, जपान, जर्मनी, ब्रिटन, इटली आदी भांडवलशाही देश धास्तावले आहेत. उद्योगधंद्यांवर याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. त्यामुळे आर्थिक विकासदर वेगाने घाली घसरला आहे. याआधी आलेल्या जागतिक मंदीपेक्षाही भविष्यातली मंदी अधिक गडद असेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

२००८ नंतर प्रथमच जागतिक आर्थिक मंदीचे संकट आले आहे. ही स्थिती जगात परलेल्या कोरोनाच्या विषाणुमुळे आली आहे. कोरोनाचा होणार फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार बंद आहेत. अमेरिका आणि चीनमध्ये सर्वच क्षेत्र बंद ठेवण्यात आले आहेत. कोरोनाचा मोठा फटका हा शेअर बाजाराला बसला आहे. शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.

तसेच अमेरिकेत बँकांना मोठा फटका बसला आहे. तर शेअर मार्केटमध्ये हाहाकार पाहायला मिळाला आहे. तर रिअर इस्टेटही धोक्यात आले आहे. अशीच स्थिती चीन आणि ब्रिटनमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे अमेरिका, ब्रिटन आणि चीनमध्ये मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे भविष्यात या देशांच्या दारात मंदीचे गडद सावट दिसून येत आहे.

दरम्यान,  जगात कोरोनाचे थैमान सुरुच आहे. जगात २० लाख १५ हजार ५७१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जगात कोरोनाने तब्बल १ लाख ३१ हजार जणांचा बळी घेतला आहे. अमेरिका आणि युरोपात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. अमेरिकेत २८,३२६ मृत्यू झालेत. तर युरोपात तब्बल ८८,७१६ मृत्यू झालेत.