फक्त 4 सेकंदात घेतो 11 तासांची झोप; 'या' प्राण्याबाबत थक्क करणारे संशोधन

प्रण्यांच्या झोपेबाबत संशोधकांनी अतिशय महत्वपूर्ण संशोधन केले आहे. यात  पेंग्विन प्राणी फक्त 4 सेकंदात 11 तासांची झोप घेत असल्याचे समोर आले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 2, 2023, 06:16 PM IST
फक्त 4 सेकंदात घेतो 11 तासांची झोप; 'या' प्राण्याबाबत थक्क करणारे संशोधन  title=

Microsleep : निरोगी आयुष्यासाठी झोप ही अत्यंत महत्वाची आहे. अगदी प्राणी देखील झोप घेतता. मनुष्याला 8 ते 9 तासांची झोप घेणे गरजेचे. पुरेशी झोप न मिळाल्यास आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होतात. माणसांप्रमाणेच प्राणी देखील झोप घेतता. प्रत्येक प्राण्याचा झोप घेण्याचा कालावधी हा वेगळा असता. मात्र, एक प्राणी असा आहे. जो फक्त 4 सेकंदात 11 तासांची झोप घेतो. संशोधकांनी या प्राण्याच्या झोपेबाबत संशोधन केले. यावेळी प्राण्याच्या झोपेबाबत अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. 

कोण आहे हा प्राणी?

4 सेकंदात 11 तासांची झोप घेणार हा प्राणी पेंग्विन आहे. अंटार्क्टिकामधील संशोधकांनी पहिल्यांदाच पेंग्विनच्या झोपण्याच्या पद्धतींवर संशोधन केले. या संशोधदनादरम्यान थक्क करणारी माहिती समोर आली आहे. पेंग्विन हा प्राणी माणसाप्रमाणे पावर नॅप घेतो याला वैज्ञानिक भाषेत मायक्रो स्लीप असे म्हणतात. पेंग्विन फक्त 4 सेकंदाची मायक्रोस्लीप घेतात. या चार सेकंदात ते 11 तास झोप घेतल्याचा अनुभव घेतात.

पिलांसाठी झोप टाळतात

संशोधनादरम्यान पेंग्विन बाबत थक्क करणारी माहिती समोर आली आहे. पेंग्विन हे माणसांप्रमाणेच कुटुंबाची काळजी घेण्यासाठी झोप टाळतात. चायनास्ट्रॅप पेंग्विन दिवसभरात वेळोवेळी 4 सेकंदांची   मायक्रो स्लीप घेतात. या मायक्रो स्लीपच्या माध्यमातून  पेंग्विन  दिवसभरात 11 तासांची झोप घेतात. पेंग्विन जेव्हा अंडी घालतात. तेव्हा शिकारी पक्षांपासून अंडी तसेच पिलांचा बचाव करण्यासाठी पेंग्विन झोपत नाही. डोळ्यात तेल घालून पेंग्विन अंडी आणि पिलांची काळजी घेतात. 

मायक्रो स्लीपचा आरोग्यावर परिणमा होतो का?

पेंग्विनचे ब्रेन स्कॅनिंक तसेच मानेच्या हालचाली यांच्या अभ्यासाद्वारे झोपेबाबतचे निरीक्षण करण्यात आले. 14 पेंग्विनचे तब्बल 11 दिवस निरीक्षण करण्यात आले. संशोधनादरम्यान पेंग्विन मायक्रो स्लीप घेत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. मात्र, या मायक्रो स्लीपचा पेंग्विनच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याबाबत काही खुलासा झालेला नाही.