"नरेंद्र मोदींना दहशतवादी घोषित करा," राम मंदिरावर लिहिलेल्या घोषणांमुळे खळबळ

Anti India Graffiti on Ram Mandir: कॅनडामधील राम मंदिरावर भारतविरोधी संदेश लिहिण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.  पंतप्रधान मोदींना दहशतवादी घोषित करा असाही उल्लेख मंदिराच्या भिंतीवर करण्यात आला आहे.   

Updated: Feb 15, 2023, 11:12 AM IST
"नरेंद्र मोदींना दहशतवादी घोषित करा," राम मंदिरावर लिहिलेल्या घोषणांमुळे खळबळ title=

Anti India Graffiti on Ram Mandir: कॅनडामध्ये राम मंदिरावर (Ram Temple) भारतविरोधी ग्रॅफिटी करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. याप्रकरणी टोरंटो (Toranto) येथील भारतीय दूतावासाने (Indian Consulate) तीव्र निषेध नोंदवला असून तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केलं आहे. Mississauga येथे हे राम मंदिर आहे. राम मंदिरावर 'पंतप्रधान मोदींना दहशतवादी घोषित करा (BBC)', 'संत भिंडरावाला शहीद आहेत', 'हिंदुस्तान मुर्दाबाद' अशा घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. 

"राम मंदिरावर लिहिण्यात आलेल्या भारतविरोधी घोषणांचा (anti-India graffiti) आम्ही निषेध करतो. आम्ही कॅनडा प्रशासनाकडे याप्रकरणी चौकशीची मागणी केली असून गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे," असं ट्वीट भारतीय दुतावासाने केलं आहे. 

Brampton चे महापौर पॅट्रिक ब्राउन यांनी हा संभाव्य द्वेषपूर्ण गुन्हा असल्याचं म्हटलं आहे. तसंच प्रशासन हे अतिशय गांभीर्याने घेत असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, "@PeelPolice आणि @ChiefNish या संभाव्य द्वेषपूर्ण गुन्ह्याला गांभीर्याने घेत आहेत. 12 विभाग तपास करत असून जबाबदार लोकांना शोधलं जाईल. धार्मिक स्वातंत्र्य हक्क असून आणि आम्ही सर्वकाही करू. प्रत्येकजण त्यांच्या प्रार्थनास्थळी सुरक्षित असे याची आम्ही खात्री करू".

कॅनडामधील हिंदू मंदिरावर भारतविरोधीत संदेश किंवा फोटो लावत द्वेष व्यक्त करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी जानेवारी महिन्यात Brampton येथील हिंदू मंदिरावर भारतविरोधी फोटो लावण्यात आले होते. यामुळे भारतीयांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. 

टोरंटो येथील भारतीय दूतावासाने गौरी शंकर मंदिरात झालेल्या तोडफोडीचा निषेध केला होता. या कृत्यामुळे कॅनडातील भारतीय समुदायाच्या भावना दुखावल्या होत्या. यापूर्वी सप्टेंबर 2022 मध्ये, कॅनडातील BAPS स्वामीनारायण मंदिराला 'कॅनडियन खलिस्तानी अतिरेक्यांनी' भारतविरोधी संदेशांसह बदनाम केले होते.