मूल जन्माला येण्याआधी महिलेला 9 महिने पोटात ते बाळ वाढवावं लागतं. गर्भधारणा झाल्यानंतर महिला गर्भवती होते आणि 9 महिन्यांनी बाळाचा जन्म होतो. ही नैसर्गिक प्रक्रिया असून प्रत्येक महिलेला यातून जावं लागतं. महिलेच्या शरिराची रचनाच अशाप्रकारे करण्यात आली आहे. पण नुकतंच एक अजब आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. हे प्रकरण आश्चर्यचकित करणारं आहे कारण यामध्ये एक महिला तब्बल 56 वर्षं गर्भवती होती.
संबंधित महिलेलाही आपण गर्भवती आहोत याची जाणीव नव्हती. एक दिवस महिलेच्या पोटात दुखू लागलं असता तिला याबद्दल समजलं. रिपोर्टनुसार, 81 वर्षीय डेनिएला वेरा नावाची महिला एका अजब स्थितीचा सामना करत होती. अचानक पोटात दुखू लागल्याने महिला डॉक्टरांकडे पोहोचली असता आपल्या पोटात कॅल्सिफाड भ्रूण असल्याचं समजलं.
डेनिएला आधीच सात महिलांची आई आहे. तिला याबद्दल आधी काहीच माहिती नव्हतं. 14 मार्चला डॉक्टरांनी तिच्यावर सर्जरी केली आणि भ्रूण हटवलं. पण या सर्जरीनंतर डेनिएला जास्त काळ जिवंत राहू शकली नाही. दुसऱ्या दिवशीच तिचं निधन झालं.
डेनिएलावर उपचार करणारे डॉक्टर पॅट्रिक डेजिरेम यांनी खुलासा केला आहे की, सर्जरीनंतर संसर्ग झाल्याने महिलेचा मृत्यू झाला. त्यांनी सांगितलं की, जेव्हा गर्भपिशवी सोडून शरीरातील इतर ठिकाणी गर्भधारणा होते तेव्हा त्याला एक्टोपिक प्रेगन्सी म्हणतात.
हा गर्भावस्थेचा एक प्रकार आहे, जिथे फर्टिलाइज्ड गर्भाच्या बाहेर गर्भधारणा करतात. तिथे ते जिवंत राहण्यास सक्षम नसतात. डेनिएलासह असंच काहीसं झालं आहे. बाळाची वाढ योग्य होत नसल्याने ते कैल्सीफाइड होतं. अशात ना शरिराला वेदना होतात, ना रक्तस्त्राव होतो. एक्स-रे काढल्यानंतरच याबाबत खुलासा होतो.