धक्कादायक, महिलेचा 10 वेळा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह, मृत्यूनंतर पॉझिटिव्ह ?

लंडनमध्ये एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. ब्रिटनमध्ये अशीच एक कोरोनाच्या (Coronavirus) नावाने घटना उघडकीस आली असून, याबद्दल सर्वांना आश्चर्य वाटत आहे. 

Updated: May 4, 2021, 07:52 AM IST
 धक्कादायक, महिलेचा 10 वेळा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह, मृत्यूनंतर पॉझिटिव्ह ?
संग्रहित फोटो

 मुंबई : लंडनमध्ये एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. ब्रिटनमध्ये अशीच एक कोरोनाच्या (Coronavirus) नावाने घटना उघडकीस आली असून, याबद्दल सर्वांना आश्चर्य वाटत आहे. येथे 55 वर्षांच्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली. दरम्यान, ती 10 दिवस रुग्णालयात राहिली. या दहा दिवसांत दररोज कोरोना चाचणी देखील केली जात होती. महिलेला कोरोना (covid-19)  प्रूफ वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. महिलेचा प्रत्येक अहवाल निगेटिव्ह (corona negative) आला, परंतु दहा दिवसांनी तिचा मृत्यू झाला. त्यावेळी तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (corona positive) आला.

उत्तर स्टॅनफोर्डशायरमधील घटना

ही घटना उत्तर स्टॅनफोर्डशायरची आहे. तिथे डेब्रा शॉ नावाच्या महिलेला रॉयल स्टोक विद्यापीठाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या महिलेचा दहा दिवसांनी रुग्णालयात मृत्यू झाला. मृत्यूनंतर, कुटुंबातील सदस्यांना शेवटच्या भेटीसाठी बोलविण्यात आले. महिलेला कोरोना नसल्याचे कुटुंबियांना सांगण्यात आले. रुग्णालयातच बरे होण्याच्या दरम्यान या महिलेला निमोनिया झाला. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनीही या कुटुंबाला मिठी मारुन त्यांचे सांत्वन केले. पण आता या प्रकरणी वेगळीच बाब पुढे आली आहे.

कुटुंबीयांचा निष्काळजीपणाचा आरोप 

'द सन डॉट यूके'च्या वृत्तानुसार, डेब्रा शॉचा मुलगा 32 वर्षांचा आहे. त्यांच्या मुलाने म्हटले की, नंतर आम्हाला सांगण्यात आले की माझी आई देखील कोरोना पॉझिटिव्ह होती. हे पूर्णपणे चुकीचे आहे. जर ती कोरोना पॉझिटिव्ह होती, तर 10 दिवसांत सगळ्या चाचणी निगेटिव्ह कशी आल्यात? आणि जर ती पॉझिटिव्ह होती तर संपूर्ण कुटुंबाला कन संपूर्ण कुटुंबाला बोलावण्यात आले आणि त्यांना का धोक्यात घालण्यात आले? आता या प्रकरणात कुटुंबीय रुग्णालयाविरोधात कारवाई करण्याचा विचार करीत आहे.