Aeroplane Seat Change: बाहेर फिरायला जाताना प्रवासात मनासारखी सीट मिळाली नाही की अनेकदा आपण ती दुसऱ्या व्यक्तीशी बदलून घेतो. मग भले ती ट्रेन असो किंवा विमान. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की, प्रवासात किंवा विमानात जागा बदलणं योग्य ठरतं का? तुम्ही कुणाला विचारून सीट बदलली तरी तुम्हाला हवी ती जागा मिळू शकते खरी. पण तुमच्या सीटवर बसून मिळणारे अनेक फायदे तुम्ही गमावताय हे तुम्हाला माहितीये का? चला जाणून घेऊया विमानात सीट का बदलू नये.
फ्लाइटच्या एअर होस्टेसच्या म्हणण्यानुसार, की सीट स्वॅप करणं म्हणजेच जागा बदलण्याची संबंधित अनेक महत्त्वाचे घटक आहेत. जसं की, अनेक वेळा प्रवासी त्यांच्या सोयी लक्षात घेऊन त्यांची जागा बदलतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही सीट बदलली तर तुम्हाला कम्फर्ट न मिळण्याची शक्यता आहे.
फ्लाइटमधील जेवण किंवा खाणं देण्यासाठी सीट नंबर दिले जातात. अशा परिस्थितीत जर तुम्ही सीट बदलली तर कदाचित तुमच्या जेवणाचीही अदलाबदल होण्याची शक्यता असते. अनेकदा केबिन क्रू खाणं सर्व करण्याची गारंटी देत नाही. एक चांगली जागा आणि कम्फर्टसाठी तुम्ही महागडी तिकिटं खरेदी करता. अशा परिस्थितीत जागा बदलल्याने तुमचे पैसे वाया जातील.
विमान उड्डाण घेण्याच्या अगोदर कधीही सीट बदलू नये. कारण फ्लाइटमधील वजन आणि तोल तुम्ही ज्या सीटवर बसला आहात त्यानुसार मोजलं गेलं असतं. एलिवेटर ट्रिम त्यानुसार सेट करण्यात येतं. एका व्यक्तीची जागा बदलल्याने फारसा फरक पडत नाही, परंतु जर एखाद्या गटाने जागा बदलल्या तर विमानाची ट्रिम कंट्रोलबाहेर जाऊन अपघाताचा धोका असतो. जागा बदलण्यापूर्वी नेहमी सीट बेल्टची लाईट जाण्याची प्रतीक्षा करावी आणि त्यानंतरच क्रूची मदत घेऊन सीट स्वॅप करा.
दुर्दैवाने विमान कोसळलं किंवा कोणत्याही प्रकारचा अपघात झाला तर अशावेळी सीट बदलल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणं अवघड जातं. अनेकदा पोलीस विमानातील काही लोकांची चौकशी करतात अशावेळी जागा बदलल्यामुळे त्यांना योग्य माहिती मिळणं कठीण जातं.