तालिबानकडे कसे पोहोचले अमेरिकीचे शस्त्र? या मागचं कारण काय?

तालिबानी अतिरेक्यांशी लढण्यासाठी अफगाणिस्तान सरकारला ब्लॅक हॉक्स देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Updated: Aug 18, 2021, 03:50 PM IST
तालिबानकडे कसे पोहोचले अमेरिकीचे शस्त्र? या मागचं कारण काय? title=

मुंबई : एका इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीनुसार, व्हाईट हाऊसने मंगळवारी कबूल केले की, तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात अमेरिकन शस्त्रे गोळा केली आहेत. समोर आलेल्या काही फोटो आणि व्हिडीओमध्ये तालिबानी अतिरेकींच्या हातात अमेरिकेचे शस्त्र दिसत आहे. तसेच त्यांच्याकडे लष्करी वाहन देखील दिसत आहेत. यामध्ये कंधार विमानतळावरील अत्याधुनिक UH-60 ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर आणि इतर उपकरणांचा समावेश आहे.

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान म्हणाले, "सर्व लष्करी उपकरणे कोठे गेली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु निश्चितच या शस्त्रांचा मोठा साठा तालिबानच्या हाती लागला आहे. परंतु आता आम्हाला हा अंदाजा नाही की, ते हे सर्व शस्त्र अमेरिकेला परत करतील की नाही."

जेक सुलिवान म्हणाले की, शत्रूकडे लाखो डॉलर्स किमतीची लष्करी शस्त्रे सोडणे हे दर्शवते की, 20 वर्षांचे युद्ध संपवण्यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसमोर किती कठीण परिस्थिती होती.

तालिबानी अतिरेक्यांशी लढण्यासाठी अफगाणिस्तान सरकारला ब्लॅक हॉक्स देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पण सरकारी सुरक्षा दलांनी तालिबानसमोर इतक्या लवकर पराभव स्वीकारला आणि तालिबानला मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि हेलिकॉप्टर सोपवले.