11 दिवसानंतर इस्त्रायल - पॅलेस्टाईनमधील रॉकेट हल्ले थांबले, जगाने सोडला सुटकेचा श्वास

11 दिवसानंतर इस्त्रायल-पॅलेस्टाईनमधील मोठा संघर्ष थांबला आहे. युद्धबंदीला पूर्णविराम लागल्याने जगाने दीर्घ श्वास सोडला आहे.

Updated: May 21, 2021, 11:06 AM IST
11 दिवसानंतर इस्त्रायल - पॅलेस्टाईनमधील रॉकेट हल्ले थांबले, जगाने सोडला सुटकेचा श्वास

मुंबई : इस्त्रायल-पॅलेस्टाईनमधील तीव्र संघर्षामुळे युद्धाचे सावट निर्माण झाले होते. कधीही युद्धाचा भडका उडू शकतो, अशी परिस्थिती गाझा पट्टीत निर्माण झाली होती. इस्त्रायल-पॅलेस्टाईनमधील संघर्ष पुन्हा पेटल्याने चिंता व्यक्त होत होती. या संघर्षात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ लेबनॉनची उडी घेतली होती. त्यामुळे आता युद्ध अटळ असल्याचे बोलले जात होते. लेबनॉननेही इस्त्रायलवर रॉकेट्सचा हल्ला चढवला. त्यामुळे आता काही खरं नाही, असे म्हटले जात होते. दरम्यान,11 दिवसानंतर इस्त्रायल-पॅलेस्टाईनमधील मोठा संघर्ष थांबला आहे. युद्धबंदीला पूर्णविराम लागल्याने जगाने दीर्घ श्वास सोडला आहे.

इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात अखेर युध्दविराम संमती झाली झाली. 11 दिवस दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या रक्तरंजित खेळानंतर युद्धबंदीची घोषणा संपूर्ण जगासाठी दिलासा देणारी आहे. कारण या युद्धाच्या महायुद्धात रुपांतर होण्याची भीती सतत वाढत होती. इस्त्रायली माध्यमांच्या वृत्तानुसार, पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सुरक्षा मंत्रिमंडळाने गाझा पट्टीमधील 11 दिवसांच्या लष्करी कारवाईला आळा घालण्यासाठी युद्धबंदीला मान्यता दिली आहे.

 या युद्धात हे देश उडी घेण्याची शक्यता 

हमासच्या एका अधिकाऱ्यानेही युद्धबंदीला दुजोरा दिला आहे. शुक्रवारी पहाटे दोन वाजल्यापासून ही युद्धबंदी लागू करण्यात आली आहे. दोन देशांच्या या युद्धामध्ये तुर्की, रशिया आणि अमेरिकेच्या थेट प्रवेशाची शक्यता वाढली होती. यामुळे असे मानले जात होते की हे युद्ध महायुद्धाचे रुप धारण करू शकेल. नुकतीच लेबनॉनने इस्रायलवर रॉकेट हल्ला झाला होता.

जो बायडेन यांची इस्रायलशी चर्चा

इस्रायलवरील हल्ला थांबवण्यासाठी दबाव वाढत होता. अगदी त्यांच्या जवळच्या मित्रपक्षानेही अमेरिकेने हमासवरील हल्ले थांबवण्याचे आवाहन केले होते. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युद्धबंदीच्या घोषणेच्या आदल्या दिवशी बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी बोलून युद्ध थांबविण्यास सांगितले. जरी, सुरुवातीच्या काळात इस्रायलने अमेरिकेच्या आवाहनाला नकार देत निर्णायक बाबीपर्यंत लढा चालू ठेवण्याचा निर्धार केला होता, परंतु आता ते युद्धबंदीसाठी राजी झालेत.

58,000 लोकांना त्यांचे घर सोडावे लागले 

गाझा आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की या युद्धात आतापर्यंत 64  मुले आणि  38 महिलांसह कमीतकमी 227  पॅलेस्टिनी मारले गेले आणि  1,620 लोक जखमी झाले. त्याचबरोबर इस्लामिक जिहाद संघटनेने म्हटले आहे की त्याचे 20 सैनिक मारले गेले. या युद्धामुळे सुमारे 58,000 पॅलेस्टाईननी आपली घरे सोडली आहेत. स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार, इस्रायलच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी सरकारला सांगितले की, पॅलेस्टाईन दहशतवादी गटाविरुद्ध किनारपट्टी भागात इस्रायलने सर्व ठिकाणी हे हल्ले चढविले होते.