एका चुकीमुळे महिलेची त्वचा झाली प्लास्टिकसारखी; 25 वर्षीय महिलेने सांगितला अनुभव

महिलेची एक चूक तिला महागात पडली आहे

Updated: Aug 22, 2022, 05:18 PM IST
एका चुकीमुळे महिलेची त्वचा झाली प्लास्टिकसारखी; 25 वर्षीय महिलेने सांगितला अनुभव  title=

डी जीवनसत्वाची कमतरता असलेल्यांना डॉक्टर नेहमीच कोवळ्या उन्हामध्ये थांबण्याचा सल्ला देतात.सकाळच्या सूर्यकिरणांमुळे डोळ्यांच्या समस्या, त्वचेचे तसेच हाडाचे विकारही कमी होतात. मात्र या कोवळ्या उन्हात काही वेळच थांबण्याचे फायद्याचे ठरू शकते. अतिप्रमाणात उन्हात थांबण धोकादायक ठरू शकतं. सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे नुकसानही होऊ शकते. होते. 

मात्र पाश्चिमात्य देशात याऊलट त्वचा टॅन (sunshine) करण्यासाठी समुद्रकिनारी भर उन्हात झोपलेले लोक तुम्ही पाहिले असतील. पण जास्तवेळ उन्हात थांबण एका महिलेलच्या चांगलंच अंगलट आलं आहे. अर्धा तास उन्हात झोपल्यानंतर 25 वर्षीय महिलेला जाग आली तेव्हा तिच्या कपाळावरची त्वचा (forehead skin ) उन्हात प्लास्टिक (plastic) वितळल्यासारखी झाली होती.

 द इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, ब्युटिशियन  म्हणून काम करणारी सिरीन मुराद ही बल्गेरियातील महिला 21 अंश तापमानात सनस्क्रीन (sunscreen) न लावता झोपली होती. एका स्विमिंग पूलजवळ 30 मिनिटे उन्हात झोपल्यानंतर जेव्हा ती उठली तेव्हा तिचा चेहरा लाल झाला होता आणि सुजलेला.

 पण तिने याकडे दुर्लक्ष करत त्याचा जास्त विचार केला नाही आणि ती तिथेच थांबून राहिली. मात्र, दुसऱ्या दिवशी तिची कपाळावरील त्वचा ओढली जात असल्याचे जाणवले. तिने आरशात पाहिल्यावर तिला कपाळ प्लास्टिकसारखे दिसत होते.

या प्रकारानंतर तिने कुटुंबियांशी बोलल्यानंतर, 25 वर्षीय ब्रिटीश महिलेने डॉक्टरकडे न जाण्याचा निर्णय घेतला कारण तिला वाटले की यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. पण काही दिवसांनी मुरादचा संपूर्ण चेहऱ्यावरील त्वचा सुरकुतलेली दिसू लागली आणि चेहऱ्यावर काळे आणि गुलाबी डाग दिसू लागले.

वेल्स ऑनलाइनच्या वृत्तानुसार, मुराद म्हणाली की, "सुरुवातीला मला फारसे काही वाटले नाही, पण नंतर जेव्हा मी त्यावर दाब दिला तेव्हा ते फुगले."

या वेदनादायक अनुभवानंतर मुराद आता सनस्क्रीनच्या वापराबाबत जनजागृती करत आहे. ती म्हणते, "तुमची त्वचा जळणार नाही असे तुम्हाला कितीही वाटत असले तरी, तुम्ही नेहमी सनस्क्रीन लावले पाहिजे."

दरम्यान, ही घटना गेल्या महिन्यात घडली असून मुरादच्या चेहऱ्यावर आता काही डाग उरले आहेत