मुंबई : आपली उंची जास्त असावी असं प्रत्येकाला वाटतं. विषेशता मुलींना आपण उंच असावं अस वाटत असतं, ज्यामुळे त्या हिल्स घालण्याच्या पर्यायाकडे वळतात. त्यामुळे जास्त उंचीचा कोणी तिरस्कार करत नाही. परंतु एका मॉडेलला आपल्या उंचीचा राग येतो आणि ती आपल्या जास्त उंचीमुळे कंटाळली आहे. जास्त उंची असण्याचे फायदे आपल्याला माहिती आहेत. परंतु याच्या तोट्याचा कधी तुम्ही विचार केलाय का?
एक रशियन मॉडेल एकटेरिना लिसिना आहे, जी तिच्या उंचीमुळे अनेक समस्यांना तोंड देत असते. तिने आपल्या उंचीमुळे गिनीज बुकमध्ये विश्वविक्रमही नोंदवला आहे. पण जास्त उंचीमुळे रशियन मॉडेलच्या आयुष्यावर बराच परिणाम झाला आहे. ज्यामुळे ती त्रस्त आहे.
34 वर्षीय एकटेरिनाची उंची 6 फूट 9 इंच आहे. ती जगातील सर्वात लांब पाय असलेली महिला आहे. त्यामुळे तिचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले आहे. नुकतेच एका मुलाखतीत याविषयी माहिती देताना तिने सांगितले की, तिच्या उंचीचा तिच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला आहे.
'डेली स्टार'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, या मॉडेलला तिच्या उंचीइतका जोडीदारही मिळत नाही. ती तिच्यापेक्षा 1 फूट लहान असलेल्या मुलाला डेट करायला तयार आहे. पण यापेक्षा लहान मुलाला ती डेट करायला तयार नाही.
रशियन मॉडेल एकतेरिना लिसिना ही बास्केटबॉल खेळाडू आहे आणि निवृत्तीनंतर ती मॉडेलिंगमध्ये आली. एकटेरीनाच्या आई-वडिलांची उंची 6 फूट 2 इंच आहे. तो इंस्टाग्रामवरही खूप सक्रिय आहे. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्याला अनेक लोक पसंत देखील करतात.