काबूलमधील सर्व भारतीय सुरक्षित, सरकार त्यांच्या संपर्कात; लवकरच सर्वांना विमानतळावर आणणार

अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूलमध्ये तालिबानी (Kabul) दहशतवाद्यांनी (Terrorists) भारतीय समन्वयक जोहिबचे अपहरण केले आहे. 

Updated: Aug 21, 2021, 01:40 PM IST
काबूलमधील सर्व भारतीय सुरक्षित, सरकार त्यांच्या संपर्कात; लवकरच सर्वांना विमानतळावर आणणार title=

काबूल : Afghanistan Crisis : अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूलमध्ये तालिबानी (Kabul) दहशतवाद्यांनी (Terrorists) भारतीय समन्वयक जोहिबचे अपहरण केले आहे. काबूलमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी तो तिथे गेला होता. दहशतवाद्यांनी त्याचा फोन हिसकावला आहे. याशिवाय 150 भारतीय बेपत्ता आहेत, त्यांच्याबाबत कोणतीही बातमी हाती नव्हती. दरम्यान, काबूलमधील सर्व भारतीय सुरक्षित असून सरकार त्यांच्या संपर्कात आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. लवकरच सर्वांना विमानतळावर आणणार येणार आहे, असे भारत सरकारकडून सांगण्यात आले.

कोऑर्डिनेटरवर दहशतवाद्यांचा हल्ला 

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, तालिबानी दहशतवादी भारतीय कोऑर्डिनेटर जवळ आले. त्यांनी त्याला त्याची ओळख विचारली. त्यानंतर त्याला मारहाण केली. यानंतर दहशतवाद्यांनी त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. तेव्हापासून भारतीय कोऑर्डिनेटरचा फोन बंद आहे.

150 भारतीय बेपत्ता झाले

दरम्यान, 150 भारतीयांचाही पत्ता नव्हता. त्यांना कुठे नेले जात आहे याबद्दल कोणतीही माहिती नव्हती. भारतीय कोऑर्डिनेटरचा फोनही बंद येत होता. दरम्यान, सूत्रांच्या हवाल्याने सर्व भारतीय सुरक्षित असल्याचे वृत्त आहे. लवकरच त्या भारतीयांना विमानतळावर परत आणले जाईल. भारत सरकार त्यांच्या संपर्कात आहे, अशी माहिती देण्यात आली.

भारतीय हवाई दलाचे C17 ग्लोबमास्टर काल रात्रीपासून काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात आहे. पण प्रचंड गर्दीमुळे भारतीयांना विमानतळावर प्रवेश करता आलेला नाही.

हक्कानी नेटवर्कला सुरक्षेची कमांड मिळाली

तालिबानने काबूलच्या सुरक्षेची जबाबदारी हक्कानी नेटवर्कला दिली आहे. हक्कानी नेटवर्कचे दहशतवादी काबूलच्या रस्त्यावरून विमानतळापर्यंत तैनात आहेत.

दरम्यान, हक्कानी नेटवर्कचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी खलील हक्कानीही काबूलमध्ये दिसला. अमेरिकेने त्याच्यावर 5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 37 कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. खलील मशिदीतही लढले. ते म्हणाले की, अफगाणिस्तानची सुरक्षा ही त्याची प्राथमिकता आहे.