इंजिनियरने डोकं लावून बनवलं सहा पायांचं गाढव; भर रस्त्यात थाटात चालतंय; पाहा Video

Donkey Vehicle Viral Video:  एखादी गोष्ट करण्याची आवड असेल तर त्या गोष्टीत तुम्ही सार्थकी होता, यात कोणताही वाद नाही. त्यातून जुगाडाचा ( jugaad ) शोध लागला असावा. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे एका पठ्ठ्याने चक्क सहा गाढव बनवला आहे.

Updated: Aug 12, 2023, 06:30 PM IST
इंजिनियरने डोकं लावून बनवलं सहा पायांचं गाढव; भर रस्त्यात थाटात चालतंय; पाहा Video title=
Engineer Built 6 Wheeler Vehicle Viral Video

Engineer Built 6 Wheeler Vehicle: गरज ही शोधाची जनन आहे, असं म्हटलं जातं. मनात जिद्द आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही, असं मोठमोठे सल्ले अनेकजण देतात. मात्र, एखादी गोष्ट करण्याची आवड असेल तर त्या गोष्टीत तुम्ही सार्थकी होता, यात कोणताही वाद नाही. त्यातून जुगाडाचा ( jugaad ) शोध लागला असावा. भारतात जुगाड ही गोष्ट शिकवावी लागत नाही. जन्मजात ती अंगात भिनली जाते. मात्र, आता चीनने देखील भारताकडून खूप काही शिकल्याचं पहायला मिळतंय. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामुळे एका पठ्ठ्याने चक्क सहा गाढव बनवला आहे.

आता असाच एक नवा जुगाड व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून सगळेच हैराण झालेत. एका व्यक्तीने आपल्या गॅरेजमध्ये पडलेल्या टाकावू वस्तूचा वापर करून 6 चाकी वाहन कसं बनवलं आहे, हे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्याने तयार केलेल्या गाडीवर स्वार होईल भर रस्त्यावर ऐटीत चालताना दिसत आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान ट्रेंडिगमध्ये असल्याचं दिसतंय. 

ट्विटरवर हा व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक करण्यात आलंय. ट्विटरवर @TansuYegen नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, चीनमधील एका अभियंत्याने गॅरेजमध्ये पडलेला सामान गोळा करून यांत्रिक गाढव (Donkey Vehicle) बनवलंय. हा व्हिडिओ आतापर्यंत 57 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओवर कमेंट करताना लोक या जुगाडने बनवलेल्या वाहनाचे कौतुक करत आहेत, तर काही लोक या वाहनाच्या वेगावर प्रश्न उपस्थित करत आहेत.

पाहा Video

दरम्यान, जगात रोबोटिक्सचं ( Robotics ) खुळ अनेकांना लागलंय. चीन, जपान, अमेरिका या तीन देशात मोठ्या प्रमाणात रोबोट्स बनवले जात आहे. त्याला आर्टिफिशियल एटेलिजन्सची (Artificial Intelligence) जोड दिली असल्याने आता वेगळं रुपात पाहिलं जाऊ शकतं. त्यासाठी भारत देखील आता येत्या काळात रोबोटिक्सचा वापर वाढेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x