पाकिस्तानात बीग बी आणि माधुरीच्या नावाने मागितली जातायंत मते

पाहा मतांसाठी कोणाच्या नावाचा होतोय अधिक वापर

Updated: Jul 24, 2018, 12:15 PM IST
पाकिस्तानात बीग बी आणि माधुरीच्या नावाने मागितली जातायंत मते title=

नवी दिल्‍ली : पाकिस्‍तानमध्ये 25 जुलैला निवडणुका होणार आहेत. सगळ्याच पक्षाचे नेते भारताचा विरोध करत मत मागत आहेत. यंदा भारत विरोध थोडा कमी असला तरी पीएम नरेंद्र मोदींच्या विरोधात मत मागितले जात आहेत. ऐवढंच नाही तर  बॉलिवूड कलाकारांच्या नावावर सुद्धा मतं मागितली जात आहेत. इमरान खानचा पक्ष तहरीक-ए-इंसाफच्या एका उमेदवाराच्या पोस्टरमध्ये हे चित्र पाहायला मिळत आहे.

मुल्‍तान येथून निवडणूक लढवत असलेले अब्‍बास डागर यांच्या पोस्‍टरमध्ये अमिताभ बच्‍चन आणि माधुरी दीक्षित यांनी लोकांचं लक्ष आकर्षित केलं होतं. हा पोस्टर इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. डागर बिग बी आणि माधुरी यांचे मोठे फॅन आहेत. यासाठी निवडणूकमध्ये यांचा फोटो लावून ते मतं मागत आहेत.
या पोस्‍टरमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या फोटोमध्ये एका लहान मुलाचा देखील फोटो आहे.

ओपिनियन सर्वेमध्ये क्रिकेटर ते नेते झालेले इमरान खान यांच्या पक्षाला बहुमत मिळताना दिसत नाही आहे. नवाज शरीफ यांचा पक्ष मुस्लिम लीग-नवाज आणि इमरान खानचा पक्ष यांच्यात खरी टक्कर आहे. पण सर्वेनुसार पंजाब प्रांतातले 14 टक्के लोकांनी आपलं मत जाहीर नाही केलं आहे. त्यामुळे यांचा कल ज्या पक्षाच्या बाजुने असेल तो पक्ष सत्तेत येईल. पंजाब प्रांत हा शरीफ यांच्या पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. नवाज शरीफ हे तुरुंगात असल्याने पक्षाचे नेते शहबाज शरीफ जे पंजाब राज्याचे मुख्‍यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या बाजुने निकाल जाऊ शकतो. पंजाब प्रांतात नॅशनल अॅसेंबलीचे सर्वात जास्त जागा आहेत.

पंजाब प्रांतांची लोकसंख्या 10 कोटी पेक्षा जास्त आहे. 272 पैकी 141 जागा या प्रांतात आहेत.