close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  

Reuters | Updated: Oct 9, 2019, 12:14 PM IST
भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

लंडन : जेम्स पीबल्स, मिशेल मेयर आणि दिदियर क्वेलॉझ यांना यंदाच्या वर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महाविस्फोटापासून आत्तापर्यंत विश्वाची उत्क्रांत होत गेलेली अवस्था आणि विश्वातील पृथ्वीचं स्थान या विषयावरील सैद्धांतिक संशोधनासाठी जेम्स पीबल्स यांना तर बाह्यग्रहाच्या शोधासाठी मिशेल मेयर आणि दिदियर क्वेलॉझ यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. विश्वाचा वेध घेणारं हे क्रांतिकारी संशोधन असल्याचं नोबेलच्या निवड समितीनं तिघांचाही गौरव करताना म्हटले आहे.

यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी वैद्यकशास्त्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. मेडिसिन क्षेत्रात जगातील सर्वोच्च समजला जाणारा हा पुरस्कार तीन शास्त्रज्ञांना संयुक्तपणे जाहीर करण्यात आला आहे. 

फिजिओलॉजी या वैध्यशास्त्रातील शोधासाठी विल्यम जी केलिन ज्युनियर, सर पीटर जे रॅटक्लिफ आणि ग्रेग एल सेमेन्जा या तिघांना संयुक्तपणे नोबेल पुरस्काराने देऊन गौरविण्यात येणार आहे. नोबेल पुरस्कार विजेत्याला पदक, प्रशस्ती पत्र आणि ४.५ कोटी रुपये रोख देण्यात येणार आहेत. या तीन शास्त्रज्ञांनी कोशिकाएंच्या ऑक्सिजन ग्रहणावर करण्यात आलेल्या शोधासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.