close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

भारताला मिळाले पहिले राफेल लढाऊ विमान

 भारतीय वायुसेनेला आपले पहिले राफेल फायटर विमान मिळाले आहे. 

Updated: Oct 8, 2019, 06:15 PM IST
भारताला मिळाले पहिले राफेल लढाऊ विमान

पॅरीस : भारतीय वायुसेनेला आपले पहिले राफेल फायटर विमान मिळाले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वत: जाऊन हे विमान आपल्या ताब्यात घेतले आहे. फ्रान्स वायुसेनेच्या फायटर प्लेनमध्ये बसून ते राफेलच्या फॅक्टरीत पोहोचले. त्यांनी फॅक्टरीची पाहणी केली. त्यानंतर फ्रान्सने औपचारिकरित्या भारताला पहिले राफेल सोपावले. भारतीय सुरक्षा दलासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. राफेल विमानांचा व्यापक तपास आणि पायलटच्या ट्रेनिंगमध्ये अधिक वेळ लागत असल्याने, राफेल भारतात आणण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे. राफेल भारतात मे २०२० पर्यंत येण्याची शक्यता आहे. राफेल फायटर जेटमुळे, भारतीय हवाई सेनेची मारक क्षमता अनेक पटींनी वाढणार आहे.

फ्रान्सकडून भारताला पहिले राफेल लढाऊ विमान

सप्टेंबर २०१६ मध्ये भारत आणि फ्रान्समध्ये ३६ राफेल विमान खरेदी करण्याचा करार झाला. या विमानांची किंमत ७.८७ बिलियन यूरो इतकी निश्चित करण्यात आली होती.

भारत फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने खरेदी करत आहे. राफेलची पहिली स्क्वॉड्रन अंबालात तैनात केली जाईल. दरम्यान, राफेल विमान खरेदी करारावरुन काँग्रेसने जोरदार टीका केली होती. या करारात मोठा घोटाळा झाल्याचे दावा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. त्यांनी लोकसभा निवडणुकीचा मुद्दाही केला होता. 

राफेल आणण्यासाठी राजनाथ सिंह पॅरिसला जाणार; फ्रान्समध्ये शस्त्रपूजन

यावर्षी दसरा आणि भारतीय हवाई सेना दिवस, हे दोन्ही दिवस ८ ऑक्टोबर रोजीच येत असल्याने विमान अधिकृतरित्या प्राप्त करण्यासाठी ८ ऑक्टोबर या दिवसाची निवड करण्यात आल्याचं बोललं जातं.