'माझे 80 टक्के ग्राहक....,' टॉप महिला एस्कॉर्टने सांगितले S** चे नियम, म्हणाली 'अनेक पुरुष तर....'

ऑस्ट्रेलियामधील एक्स्कॉर्ट मिकी डॅनिअलने नुकतंच तिचं काम आणि ग्राहकांमध्ये दिसणारा नवीन ट्रेंड यावर भाष्य केलं आहे. तिची मुलाखत व्हायरल झाली आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 5, 2024, 04:22 PM IST
'माझे 80 टक्के ग्राहक....,' टॉप महिला एस्कॉर्टने सांगितले S** चे नियम, म्हणाली 'अनेक पुरुष तर....' title=

ऑस्ट्रेलियामधील महिला एक्स्कॉर्ट मिकी डॅनिअलने त्यांच्या क्षेत्रात सेक्ससंबंधी काय नियम आहेत याबाबत खुलासे केले आहेत. एका वृत्तपत्राला दिलेल्या स्फोटक मुलाखतीत तिने अनेक खुलासे केले आहेत. आपण आपल्या 80 टक्के ग्राहकांसोबत झोपत नाही सांगितल्यावर अनेकांचा विश्वास बसत नाही असं तिचं म्हणणं आहे. अनेक ग्राहकांना फक्त आपल्यासोबत वेळ घालवायचा असतो. पुरुषांच्या एकटेपणामुळे हा नवा ट्रेंड आला आहे असं तिचं म्हणणं आहे. 

"कोणीही विश्वास ठेवणार नाही पण मी माझ्या 80 टक्के ग्राहकांसोबत झोपत नाही. माझ्याकडे अशा अनेक बुकिंग आहेत ज्यामध्ये पुरुष आम्हाला सेक्स करायचा नाही, तर फक्त इतर गोष्टी करण्यात वेळ घालवायचा आहे असं सांगतात," अशी माहिती 29 वर्षीय मिकी डॅनिअलने news.com.au ला दिली आहे.

'नवा ट्रेंड दु:खदायक'

"अनेक पुरुषांना आपल्या ओळखीची चिंता वाटत आहे. आपल्या प्रेयसी आणि पत्नीसह असतानाही त्यांना आपण जे आहेत ते सतावणारं आहे. मला वाटत नाही की अनेक पुरुष नात्यांमध्ये फार सुखी आहेत. त्यांच्यावर समाजाचा फार दबाव आहे," असं ती म्हणाली आहे. आपल्या या विधानाचं स्पष्टीकरण देताना ती म्हणाली की, अनेक पुरुष आपल्याकडे फक्त दिलासा, समाधान मिळावं यासाठी देतात. याचं कारण त्यांना मी त्यांना ते कोण आहेत यावरुन मत निर्माण करणार नाही याची कल्पना असते. 

'अनेक ग्राहकांना फक्त बोलायचं असतं'

डॅनिअल्सने सांगितलं की, भेट झाल्यानंतर अनेक ग्राहक मला माझ्या आयुष्याबद्दल विचारतात. तसंच आपण काय केलं याबद्दल सांगतात. त्यांना फक्त त्यांच्या समस्यांवर चर्चा करायची असते. "मला वाटतं की त्यांना आपलं घर, कार्यालय किंवा दोन्ही ठिकाणी काय सुरु आहे याव्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयावर बोलायचं असतं,' असं ती म्हणाली. डॅनिअल्स प्रत्येक तासासाठी 1300 डॉलर्स घेते. 

अनेकदा ही चर्चा इतकी गंभीर होते की आपण फार थकतो असंही ती म्हणाली. "प्रत्येक बुकिंगनंतर मला भावनिकदृष्ट्या फार थकलेलं वाटतं. एक एस्कॉर्ट म्हणून, मी स्वतःला भावनिक आणि आध्यात्मिक आणि मानसिकदृष्ट्या अर्पण करते जेणेकरून त्यांना चांगला अनुभव घेता येईल,” असं तिने सांगितलं.

ब्रिस्बनमधील मिकी डॅनियल्सचं इंस्टाग्राम अकाऊंटही आहे, ज्यात 170 हून अधिक पोस्ट आणि जवळपास 81,000 फॉलोअर्स आहेत. ती नियमितपणे वेगवेगळा कंटेंट पोस्ट करते. ज्यामधून फॉलोअर्सनी तिच्या आयुष्याची झलक पाहायला मिळते. 

Tags: