Baba Vanga Predictions 2023: कोरोनानंतर नागरीकांना 'या' विनाषकारी समस्या भेडसावणार, बाबा वेंगा यांची भविष्यवाणी

Baba Vanga Predictions 2023 : बाबा वेंगा (Baba Vanga Predictions 2023) यांनी 2023 या नवीन वर्षासाठी केली आहेत. ही भाकिते आता किती खरे आणि किती खोटे ठरतात, हे येत्या वर्षात कळणार आहे. 

Bollywood Life | Updated: Dec 8, 2022, 02:08 PM IST
 Baba Vanga Predictions 2023: कोरोनानंतर नागरीकांना 'या' विनाषकारी समस्या भेडसावणार, बाबा वेंगा यांची भविष्यवाणी title=

Baba Vanga's predictions for 2023 : बल्गेरीयाचे जगप्रसिद्ध बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी आतापर्यंत अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. या सर्व भविष्यवाण्या आतापर्यंत खऱ्या ठरल्या आहेत. जगभरावर कोरोना सारखी आलेली वैश्विक महामारी देखील त्यांनी अचूक सांगितली होती. त्यामुळे आता पुढे काय असा प्रश्न देखील नागरीकांना पडला आहे. त्यात आता बाबा वेंगा (Baba Vanga Predictions 2023) यांची 2023 सालची भविष्यवाणी समोर आली आहे. ही भविष्यवाणी एकूण अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. 
 
येत्या 2023 या नवीन वर्षासाठी बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी अनेक भविष्यवाण्या केल्य़ा आहेत. यामध्ये त्यांनी या वर्षात विणाशकारी सौर वादळ, पृथ्वीवर एलियन येणार, बाळांचा जन्म लॅबमध्ये आणि पृथ्वीच्या कक्षेत बदल अशी अनेक भाकित केली आहेत. या भाकितांचा नागरीकांवर थेट परिणाम होणार आहे. 

विणाशकारी सौर वादळ 

बाबा वेंगा (Baba Vanga Predictions 2023) यांच्या भाकितांनुसार नवीन वर्षात एक सौर वादळ येणार आहे, हे वादळ विणाशकारी असणार आहे. सौर वादळ म्हणजे सूर्यापासून निघणाऱ्या ऊर्जेचा स्फोट, ज्यामुळे पृथ्वीवर अनेक प्रकारचे धोकादायक रेडिएशन पडतील. याचा प्रभाव अब्जावधी अणुबॉम्ब सारखा शक्तिशाली असू शकतो. त्यामुळे हे भाकित नागरीकांसाठी खुपच धडकी भरवणारे आहे. 

एलियन पृथ्वीवर येणार

बाबा वेंगा (Baba Vanga Predictions 2023) यांचे सर्वात धक्कादायक भाकित म्हणजे, या वर्षात पृथ्वीवर एलियन येण्याची शक्यता आहे. यामुळे संपुर्ण जग अंधारात झाकले जाऊ शकते. तसेच एलियन्स जर पृथ्वीवर आले तर लाखो लोक मारले जाण्याचा दावा त्यांनी केला होता.

लॅबमध्ये होणार बाळांचा जन्म

बाबा वेंगा (Baba Vanga Predictions 2023) यांच्या भाकितांनुसार, 2023 मध्ये मानवी बालके प्रयोगशाळांमध्ये वाढू शकतात. विज्ञानातील सातत्यपूर्ण प्रगतीमुळे लॅबमध्ये जन्माला येणारी बाळं ही संकल्पना बाबा वेंगाच्या भविष्यवाणीत समाविष्ट आहे.

पृथ्वीच्या कक्षेत बदल?

सूर्याभोवती फिरणारी पृथ्वी 2023 मध्ये आपला मार्ग बदलू शकते. आपला ग्रह सूर्याभोवती फिरत असताना दरवर्षी 584 दशलक्ष मैलांचा प्रवास करतो.हा एक प्रवास आहे जो संपूर्ण गोलाकार ऐवजी अंडाकृती आहे. यामुळे इतर ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा परिणाम होतो. म्हणजे पृथ्वीच्या कक्षेत बदल होऊ शकतो. असे बदल हजारो वर्षांत एकदाच घडतात. पृथ्वीच्या कक्षेत थोडासाही बदल झाला तर त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात, असे भाकित बाबा वेंगा (Baba Vanga) यांनी वर्तवले आहे.

दरम्यान अशी काही भाकिते बाबा वेंगा (Baba Vanga Predictions 2023) यांनी 2023 या नवीन वर्षासाठी केली आहेत. ही भाकिते आता किती खरे आणि किती खोटे ठरतात, हे येत्या वर्षात कळणार आहे.