बांग्लादेशमध्ये इस्कॉन मंदिरावर जमावाचा हल्ला, मंदिरात घुसून लूटमार, 3 कर्मचारी जखमी

बांगलादेशची राजधानी ढाका इथल्या इस्कॉन मंदिरावर हल्ला झाला आहे. 200 हून अधिक लोकांनी इस्कॉन राधाकांता मंदिरावर हल्ला केला, 

Updated: Mar 18, 2022, 01:51 PM IST
बांग्लादेशमध्ये इस्कॉन मंदिरावर जमावाचा हल्ला, मंदिरात घुसून लूटमार, 3 कर्मचारी जखमी title=

ढाका :  बांगलादेशमध्ये (Bangladesh) हिंदू अल्पसंख्याकांच्या रक्षणाची बांगलादेश सरकारची सर्व आश्वासनं पुन्हा एकदा फोल ठरली आहेत. बांगलादेशची राजधानी ढाका (Dhaka) इथल्या एका मंदिराला गुरुवारी रात्री जमावाने लक्ष्य केलं. 200 हून अधिक लोकांच्या जमावाने मंदिराची तोडफोड करुन लूट केली. यात मंदिरातील काही कर्मचारी जखमी झाले आहेत. 

इस्कॉन मंदिरात तोडफोड
मिळालेल्या माहितीनुसार, हाजी शफिउल्ला याच्या नेतृत्वाखालील 200 हून अधिक लोकांनी काल संध्याकाळी 7 वाजता ढाका इथल्या 222 लाल मोहन साहा स्ट्रीटवरच्या इस्कॉन राधाकांता मंदिरावर (Iskcon Temple) हल्ला केला, यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी मंदिरात लूटमारही केली. या हल्ल्यात अनेक हिंदू जखमी झाल्याची माहिती आहे. 

याआधीही मंदिरांवर हल्ला
बांगलादेशात हिंदू मंदिरांवर हल्ल्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या वर्षी नवरात्रीच्या काळात काही दुर्गा पूजा मंडपांवर हल्ले करण्यात आले होते. यादरम्यान अनेक मंदिरांवरही हल्ले झाले. या हिंसाचारात 2 हिंदूंसह 7 जणांचा मृत्यू झाला. त्यावेळीही ढाक्यातील इस्कॉन मंदिरावर हल्ला झाला होता.