वॉशिंग्टन: शर्लोट्सविले मध्ये झालेल्या हिंसेबद्दल अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांनी दक्षिण आफ्रिकेचे रंगभेद विरोधी नेता नेल्सन मंडेला यांना उद्देशून एक ट्वीट केले आहे. आणि ते आतापर्यंतचे सगळ्यात लोकप्रिय ट्वीट झाले आहे. त्याला २० लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केले आहे.
काय होते ते ट्वीट ?
ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ''त्वचेचा रंग, बाहेरील आवरण किंवा धर्म या कशाही मुळे कोणतीही व्यक्ती दुसऱ्या प्रती द्वेष घेऊन जन्माला येत नाही.'' शनिवारी या ट्वीटसोबत त्यांनी एक फोटो देखील शेयर केला. ज्यामध्ये वेगवेगळ्या जातीची लहान मुले एका खिडकीत उभी आहेत.
"No one is born hating another person because of the color of his skin or his background or his religion..." pic.twitter.com/InZ58zkoAm
— Barack Obama (@BarackObama) August 13, 2017
सगळ्यात जास्त लाईक्स मिळाले:
सिलिकॉन वॅलीतील एका सोशल मीडिया कंपनीने सांगितले की, ''बाराक ओबामा यांचे हे ट्वीट आतापर्यंतचे सगळ्यात लोकप्रिय ट्वीट झाले आहे.'' या ट्वीटला २८ लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाईक केले असून १२ लाखांपेक्षा अधिक रिट्वीट मिळाले आहेत. तसंच कंपनीने हे देखील सांगितले की, ''हे ट्वीट आतापर्यंतच्या रिट्वीटच्या बाबतीत पाचव्या स्थानावर आहे.''