चीनच्या भविष्यवेत्त्यानं 700 वर्षापूर्वी केलं होतं कोरोनाचं भाकीत, "2024 साली..."

Baba Vanga आधी 'या' भविष्यवेत्ताकडून कोरोनाचं भाकीत, जाणून घ्या भविष्यवाणी 

Updated: Aug 9, 2022, 01:43 PM IST
चीनच्या भविष्यवेत्त्यानं 700 वर्षापूर्वी केलं होतं कोरोनाचं भाकीत, "2024 साली..."   title=

नवी दिल्ली : प्रसिद्ध भविष्यवेत्ता बाबा वंगा (Baba Vanga) यांनी मृत्यूपुर्वी अनेक भाकीत वर्तवली होती. त्यांनी वर्तवलेल्या आठ भाकितांपैकी आतापर्यंत 2 भाकीत खरी ठरली आहेत. तर इतर भाकीतंही अचूकचं ठरतील असे असंख्य भविष्यवेत्ता यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता त्यांच्या इतर भाकितांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. बाबा वंगा (Baba Vanga prediction)  यांनी कोरोनाचं भाकीत वर्तवल होतं, हे भाकीत खरं ठरलं. यानंतर आता बाबा वंगा (Baba Vanga)यांच्या आधी आणखीण एका भविष्यवेत्ताने कोरोनाचं भाकित केल्याचं समोर आलं आहे. त्यांनी कोरोना संदर्भात काय भाकीत केलं होत व ते कस खर ठरलंय ते जाणून घेऊय़ात. 

बाबा वंगा (Baba Vanga) यांच्याआधी चायनीज भविष्यवेत्ता लिऊ बोवेन (Liu Bowen) यांनी कोरोना (Corona prediction) संदर्भात भविष्यवाणी केली होती. विशेष म्हणजे त्यांनी 700 वर्षापुर्वीचं कोरोनाची भविष्यवाणी केली होती. लिऊ बोवेन (Liu Bowen) यांनी 700 वर्षापुर्वी पुर्वी 'द टेन व़ॉरीज' (The Ten Worries) नावाची कविता लिहली होती. या कवितेत चीनी राशीनुसार डूक्कर आणि उंदराचं वर्ष 2019 ते 2020 होते. याच राशीनुसार  कवितेच्या माध्यमातून त्यांनी जगभरात कोरोनाची वैश्विक महामारी कधी पसरणार व ही महामारी किती वर्ष असणार यांची माहिती देण्यात आली आहे.  

कवितेतली भविष्यवाणी काय होती?
2019 यावर्षी चिनी नववर्ष हे 5 फेब्रुवारीला होते. प्रत्येक चिनी नववर्ष (Chinese New Year) हे प्राण्यांचे प्रतीक आहे. 2019 हे डुक्कराचे (Year Of The Pig) वर्ष होते. तर 2020 ला चिनी नवीन वर्ष 25 जानेवारी रोजी होते. हे वर्ष उंदराचे प्रतीक (Year Of The Rat) होते. डूक्कर आणि उंदरातून जगभरात कोरोनाचा संसर्ग पसरल्याचा दावा काही अहवालातून करण्यात आला होता. त्यामुळे हे वर्ष कोरोना महामारीच होत हे त्यांच्या कवितेतून स्पष्ट होतेय. 

कोरोनाचा अंत होईल ?
पुढे कवितेत लिऊ बोवेन (Liu Bowen) यांनी म्हटले होते की, ड्रॅगन आणि सापाच्या वर्षांत सर्व महामारी निघून जाईल. ड्रॅगन आणि सापाची चिनी राशीची चिन्हे अनुक्रमे 2024 आणि 2025 ही वर्षे आहेत. या वर्षात कोरोनाचा अंत होईल असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या 2022 सुरु आहे आणि जगभरात कोरोनाचा आलेख खालवताना दिसत आहे. त्यामुळे लिऊ बोवेन यांनी कवितेतून वर्तवलेली ही भविष्यवाणी खरी ठरण्याची शक्यता आहे.  

कोण आहेत भविष्यवेत्ता लिऊ बोवेन?
लिऊ बोवेन (Liu Bowen) हे जाणकार आणि आदरणीय पंतप्रधान असण्याव्यतिरिक्त ताओवादी गुरु होते. लिऊ बोवेन यांचा जन्म 1 जुलै 1311 रोजी झाला होता आणि 16 मे 1375 रोजी त्यांचा मृत्यू झाला होता.

कवितेवर आक्षेप
मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही समीक्षकांचा असा दावा आहे की लिऊ बोवेन (Liu Bowen) यांनी कविता लिहिल्याचा कोणताही पुरावा नाही. अनेकांचा असा विश्वास आहे की ही कविता अज्ञात सम्राटाने रचली होती, ज्याने आपल्या कारकिर्दीत आपत्तींपासून संरक्षण करण्यासाठी राजकीय साधन म्हणून वापरली होती. सम्राटाने असाही दावा केला की, ती कविता वैध करण्यासाठी लिऊ बोवेन (Liu Bowen) यांनी लिहिली होती. त्याचा अंदाज खरा ठरतो की नाही हे आता येणारा काळच सांगणार आहे.  

दरम्यान लिऊ बोवेन (Liu Bowen) यांनी कवितेत सांगितलेल्या वर्षात कोरोनाचा जगभरात शिरकाव झाला होता. आता कोरोनाचा नायनाट हा 2024 आणि 2025 वर्षी होईल अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. त्यामुळे ही भविष्यवाणी खरी ठरतेय का हे येत्या वर्षात कळणार आहे.