बाळाच्या उपचारासाठी आई रस्त्यावर विकतेय स्वत:चे दूध

या महीलेने हे पाऊल उचलण्यामागची कहाणी मोठी धक्कादायक आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 7, 2018, 12:00 PM IST
बाळाच्या उपचारासाठी आई रस्त्यावर विकतेय स्वत:चे दूध title=

पेईचिंग : जगातील सर्वात सुंदर आणि बहुचर्चीत शहरांपैकी एक असलेल्या चीनमधील शांघाय शहातून एक खळबळजनक वृत्त आहे. शहराच्या एका रस्त्यावर एक महिला चक्क स्वत:चेच दूध विकताना दिसत आहे. ही महिला रस्त्यावरच्या पादचाऱ्यांनाही दूध पिण्याचा आग्रह करते. या प्रकारमुळे ही महिली सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमातही चर्चेचा विषय ठरली आहे. पण, तिने हे पाऊल उचलण्यामागची कहाणी मोठी धक्कादायक आहे.

महिलेचे वय २४ वर्षे

रस्त्यावर दूध विकत असलेल्या या महिलेने जे पाऊल उचलले आहे. ते पाऊल केवळ प्रसिद्धी किंवा स्टंटबाजी म्हणून नव्हे. वय वर्षे २४ असलेली ही महिला आई असून, तिला एक छोटी मुलगी आहे. चीनी वेबसाईट शांघाईईटने दिलेल्या वृत्तानुसार ही महिला आपल्या मुलीच्या आजारावर उपचार करण्यासाठी पैसे जमा करत आहे. तिच्या या कामात तिला तिचा पतीही मदत करत आहे. 

१० यूआनमध्ये एक मिनीटात ब्रेस्टफीडींगचा आनंद

प्राप्त माहितीनुसार, ही महिला रस्त्यावर दूध विकत असताना तिचा पती तिच्या बाजूला एक फलक घेऊन उभा आहे. फलकावर लिहीले आहे, 'सर्व वयोगटातील लोकांसाठी आम्ही ही सेवा देत आहोत. एक मिनीट स्तनपानाच्या बदल्यात १० यूआन (चीनचे एक चलन) इतका मोबदला द्यावा लागेल. आपले सहकार्य अपेक्षीत आहे. धन्यवाद!'.

सर्व वयोगटांच्या व्यक्तिसाठी दूध उपलब्ध

ही महिला चीनच्या शिनजियांग प्रांतातील आहे. आपल्या हातातील फलकावर महिलेने संपूर्ण माहिती दिली आहे. अधिकच्या मजकूरात महिलेने म्हटले आहे, 'माझे वय २४ वर्षे आहे.मी पूर्णपणे निरोगी असून, माझ्या बाळावरील वैद्यकीय उपचाराच्या खर्चाचे बील देण्यासाठी मी रस्त्यावर दूध विकत आहे. सर्व वयोगटाच्या लोकांनी मदत करावी. कोणताही व्यक्ती बील देऊन ऑनसाईट ब्रेस्टफीडींग करू शकतो. आपल्या सहकार्याबद्धल धन्यवाद'. एसा स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार महिलेने एका जुळ्याला काही दिवसांपूर्वीच जन्म दिला आहे आणि दोन्ही बाळं रूग्णालयात आहेत.