Britain Queen Elizabeth II होत्या 15 देशांच्या महाराणी; जाणून घ्या देशांची नावं

या राणीचं अजून एक वैशिष्ट्यं म्हणजे राणी एलिझाबेथ (Elizabeth) या केवळ ब्रिटनच्या राणी नव्हत्या तर त्याशिवाय त्या 15 देशांच्या महाराणी होत्या.

Updated: Sep 9, 2022, 11:17 AM IST
Britain Queen Elizabeth II होत्या 15 देशांच्या महाराणी; जाणून घ्या देशांची नावं title=
Britain Queen Elizabeth II was the queen of 15 countries

Britain Queen Elizabeth II died: ब्रिटनची राणी एलिझाबेथ II यांच्या निधनानंतर सर्व जगावर शोककळा पसरली आहे. एवढेच नाही तर जगातील अनेक देश या शोकात इंग्लंडचे भागीदार होत आहेत. राणीच्या निधनावर जगातील अनेक देशांनी शोक व्यक्त केला आहे. ब्रिटनमध्ये 10 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर फ्रान्सने आयफेल टॉवरचे दिवे बंद केले. या दुःखद बातमीनंतर ब्राझीलने देशभरात तीन दिवसांचा अधिकृत दुखवटा जाहीर केला आहे. 1952 मध्ये वडील जॉर्ज सहावा यांच्या निधनानंतर एलिझाबेथ राणी बनल्या होत्या. तेव्हा त्यांचं वय अवघे 25 वर्षांचं होतं. या राणीचं अजून एक वैशिष्ट्यं म्हणजे राणी एलिझाबेथ (Elizabeth) या केवळ ब्रिटनच्या राणी नव्हत्या तर त्याशिवाय त्या 15 देशांच्या महाराणी होत्या. (Britain Queen Elizabeth II was the queen of 15 countries)

एलिझाबेथ 'या' देशांच्या होत्या राणी (Elizabeth was the queen of 'these' countries)

1. कॅनडा (Canada)
2.ऑस्ट्रेलिया (Australia)
3. न्यूझीलँड (New Zealand)
4. जमैका (Jamaica)
5. बहामास (The Bahamas)
6. ग्रॅनाडा (Granada)
7. सोलोमन बेटे (Solomon Islands)
8. तुवालू (Tuvalu)
9. सेंट लुसिया (Saint Lucia) 
10. सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स (St. Vincent and the Grenadines)
11.पापुआ न्यू गिनी (Papua New Guinea) 
12. अँटिग्वा आणि बार्बुडा (Antigua and Barbuda) 
13. सेंट किट्स आणि नेव्हिस (St. Kitts and Nevis) 
14.बेलीज (Belize)

खरंतर, या देशांचा राजा म्हणून राणीची भूमिका मुख्यत्वे प्रतीकात्मक होती. ती राज्याची प्रमुख मानली जात असल्याने तिचा प्रत्यक्ष कारभारात सहभाग नव्हता. तर 2021 पर्यंत या लीस्टमध्ये बारबाडोस हा देश पण सहभागी होता. 2021नंतर या देशाने आपलं राज्य घोषित केलं. 

एलिझाबेथ II राणी 15 देशांची महाराणी होती, ज्याला  कॉमनवेल्थ क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. एलिझाबेथ II ही एकमेव राणी होती जी एकापेक्षा जास्त देशांची राणी होती. 6 फेब्रुवारी 1952 रोजी त्यांचा वडील जॉर्ज सहावा यांचं निधन झाल्यानंतर एलिझाबेथ राणी बनल्या. त्यावेळी त्या यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तानसह 32 देशांच्या राणी होत्या.