Prince Harry News: ब्रिटनच्या राजघराण्याशी संबंधित अनेक गुपितं आजवर जगासमोर आली आणि प्रत्येक वेळी ही गुपितं ऐकणाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. (Queen Victoria) राणी व्हिक्टोरियापासूनची ही गुपितं अगदी महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth), प्रिन्स हॅरी यांच्यापर्यंत संलग्न असल्याचं पाहायला मिळालं. सध्याच्या घडीला प्रिन्स हॅरी राजघराण्यापासून दूर असले तरीही या कुटुंबाशी निगडीत अनेक गोष्टी आणि अनेक गुपितं, चर्चा काही त्यांची पाठ सोडत नाहीयेत.
हल्लीकडे त्यांनी असाच एक मोठा खुलासा केला आणि पुन्हा एकदा अनेकांच्याच नजरा वळल्या. (King Charles III) किंग चार्ल्स III आपले वडील नसल्याच्या चर्चांबाबत अखेर प्रिन्स हॅरी यांनी मौन सोडलं. 'न्यूजवीक'च्या वृत्तानुसार हल्लीच झालेल्या एका न्यायालयीन सुनावणीमध्ये प्रिन्स हॅरी यांनी ब्रिटनच्या अनेक माध्यम प्रतिनिधींनी किंग चार्ल्स III आपले वडील नसून, मेजर जेम्स हेविट आपले वडील असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला किंबहुना हा प्रयत्न आजही सुरु असून, असं करत त्यांना आपल्याला राजघराण्यातून बेदखल करायचं असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.
Duke Of Sussex प्रिन्स हॅरी यांनी मिरर ग्रुपच्या वृत्तपत्रांविरोधात खटला दाखल करत त्यांच्यावर फोन टॅपिंगसाठी चुकीच्या पद्धतींचा वापर केल्याला गंभीर आरोप केला. खळबळजनक मथळ्यांच्या वृत्तांसाठी माहिती मिळवण्याच्या हेतूनं हे सर्वकाही सुरु असल्याला आरोपही त्यांनी केला.
दिवंगत प्रिन्सेस डायना (Princes Diana) यांनी त्यांच्या आणि जेम्स हेविट यांच्या नात्याचा स्वीकार केल्यानंतर अनेक माध्यमांनी प्रिन्स हॅरी यांचे वडील हेविटच असल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. या सर्व प्रकरणांची वाच्यता अखेल न्यायालयापुढे झाली. जिथं प्रिन्स हॅरी यांनी आपली आई आपल्या जन्मापर्यंत मेजर जेम्स हेविट यांना भेटलीच नसल्याचं लिखित स्वरुपात सांगितलं.
मेजर जम्स हेविट हे ब्रिटीश सैन्यदलात एक माजी कॅवेलरी अधिकारी होते. साधारण नव्वदच्या दशकामध्ये ते प्रिन्सेस डायना यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते. प्रिन्स चार्ल्स आताचे किंग चार्ल्स III यांच्यासोबत विवाहबंधनात असतानाच प्रिन्सेस डायना 1986 ते 1991 दरम्यान जवळपास पाच वर्षे हेविट यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होत्या. तर, हेविट यांची भेट होण्याआधीच 2 वर्षांपूर्वी प्रिन्स हॅरी यांचा जन्म झाला होता.