लंडन : ब्रिटीश लेखक आणि राजकीय विश्लेषक मॅथ्यू गुडविन यांनी आपल्या पुस्तकाच्या प्रती खाल्ल्या आहे.. निवडणुकी दरम्यान दिलेले अंदाज चुकल्यानं मॅथ्यूनं हे पाऊल उचललंय.
निकालापूर्वी मॅथ्यू यांनी स्वतःचे अंदाज चुकले तर अंदाज वर्तवणारं पुस्तक खाईन असं म्हटलं होतं. तेच त्यांनी सत्यात उतरवलंय. 'ब्रेक्जीट, व्हाय ब्रिटेन वोटेड टू लीव्ह दि युरोपियन युनियन' हे पुस्तक निवडणुकीआधी त्यांनी लिहिलं होतं. त्यामध्ये लेबर पार्टीला त्यांच्या अंदाजानुसार 38 टक्के मतं मिळतील असा अंदाज होता.
मात्र जेरेमी कॉरबिन यांच्या लेबर पार्टीला 40.3 टक्के मतं मिळाली. दोन टक्के अंदाज चुकणं ही सुद्धा फार मोठी बाब असल्याचं सांगत मॅथ्यू गुडविन यांनी आपल्या पुस्तकाच्या प्रती प्रसारमाध्यमांसमोर खाल्ल्या. आताच्या काळात तसा शब्द पाळणं कठीणंच मात्र लेखक मॅथ्यू गुडविन यांनी शब्द पाळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.