आणखी काय हवं! या कंपनीकडून प्रत्येक कर्मचाऱ्याला दिवाळीचा छप्पड फाड के बोनस

कोरोनाच्या 2 वर्षांनंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त दिवाळी  (Diwali 2022) साजरी करण्यात येत आहे. 

Updated: Oct 22, 2022, 06:59 PM IST
आणखी काय हवं! या कंपनीकडून प्रत्येक कर्मचाऱ्याला दिवाळीचा छप्पड फाड के बोनस title=
प्रातिनिधिक छायाचित्र

Diwali Bonus : सर्वत्र दिवाळीचा (Diwali 2022) उत्साह पहायला मिळतोय. कोरोनाच्या 2 वर्षांनंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करण्यात येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसह खासगी कर्मचाऱ्यांनाही कंपनीकडून दिवाळी भेटसह बोनसही देण्यात आलाय. मात्र अशात एका कंपनीची एकच चर्चा होतेय. त्याचं कारणही तसंच आहे. या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना थोडंथोडकं नव्हे तर तब्बल 56-56 हजार रुपये बोनस म्हणून देण्याची घोषणा केली आहे. कर्मचाऱ्यांना ही बोनसची रक्कम ऑक्टोबर आणि जानेवारीत देण्यात येणार आहे. इनोप्लास टेक्नोलॉजी लिमिटेड (Inoplas Technology Limited) या ब्रिटिश कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयाचं कौतुक केलं जातंय.  (british company Innoplus technology limited decided to give rs 56 thousand as bonus to employees)

यूकेमध्ये महागाई वाढतच आहे. सर्वसामान्य जनतेवर आर्थिक ताण वाढतोय. हा मुद्दा लक्षात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत आपल्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे. "बोनसच्या या रकमेमुळे कर्मचाऱ्यांना थोडा दिलासा मिळेल, ते घराचे बिल भरू शकतील, कारण लोकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.", असं  कंपनीचे संचालक बॉब डेव्हिस म्हणाले.   

"तसेच उत्पादकता वाढवण्यासाठी कंपनीने नवीन उपकरणांमध्ये गुंतवणूक केली आहे. कंपनी आता नवीन सोलर पॅनल बनवण्याचे काम करत आहे, जेणेकरून लोकांचे वीज बिल कमी होईल", असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं. 

यूकेमध्ये महागाई विक्रमी उच्च पातळीवर

यूकेमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने सप्टेंबरमध्ये चलनवाढीचा दर 10.1 टक्क्यांच्या 40 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला. यूकेच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने बुधवारी सप्टेंबरसाठी ग्राहक किंमत निर्देशांक-आधारित महागाई डेटा जारी केला. निर्देशांकाने महिन्यासाठी 10.1 टक्क्यांनी उसळी घेतली. ऑगस्टमध्ये महागाई 9.9 टक्क्यांवर पोहोचली होती.