दुबईतील बुर्ज खलिफा इमारतीवर महात्मा गांधींची प्रतिमा, अशी वाहिली श्रद्धांजली

जगातील सर्वात उंच इमारतीवर महात्मा गांधींची प्रतिमा

Updated: Oct 2, 2020, 10:36 PM IST
दुबईतील बुर्ज खलिफा इमारतीवर महात्मा गांधींची प्रतिमा, अशी वाहिली श्रद्धांजली title=

दुबई : आज शुक्रवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 वी जयंती संपूर्ण जगात वेगळ्या प्रकारे साजरी करण्यात आली. जगभरातील लोकांनी त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने आठवण काढली. 

जगातील सर्वात उंच इमारत, बुर्ज खलिफा या इमारतीवर महात्मा गांधींची प्रतिमा भारतीय ध्वजासह प्रकाशित करण्यात आली आहे. रोषनाईने यावेळी इमारतीवर महात्मा गांधी यांची आगळी वेगळी प्रतिमा एका खास संदेशासह दाखवण्यात आली. दुबई येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने त्यांच्या आवारात स्वच्छता मोहीम राबवून या प्रसंगी महात्मा गांधीची आठवण केली.

अमेरिकेच्या संसदेच्या खालच्या सभागृहातील प्रतिनिधींनी आज महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला खासदार रोहित खन्ना यांनी एक संदेश पोस्ट केला की, बापूंनी आम्हाला शिकवलं आहे की न्यायासाठी सर्वोत्तम लढा अहिंसेच्या तत्त्वांसह लढला जाऊ शकतो.'

दुसरीकडे चीननेही महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. चीन म्हणाला की, बापूंचे तत्त्वज्ञान आपल्याला नेहमी प्रेरणा देईल. पाकिस्तानमधील भारतीय दूतावासातही गांधी जयंती साजरी करण्यात आली. गांधी जयंतीनिमित्त युक्रेनच्या कीवमध्ये बापूंच्या कास्याच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

अमेरिकेचे खासदार टॉम सूझी यांनी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहताना म्हटलं की, त्यांनी आपल्या कार्याचा प्रभाव अनेकांवर टाकला आहे. त्याचवेळी खासदार टीजे कॉक्ससा आणि माईक फिट्जपॅट्रिक यांनीही श्रद्धांजली वाहिली. खासदार अ‍ॅमी बेरा यांनी म्हटलं की, 'गांधी हे सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत.'