अरे देवा ! अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे सामान घेऊन कॅब ड्रायव्हरचे पलायन

Bollywood Actress Swara Bhasker : बॉलिवूडची अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिला मोठा धक्का बसला आहे.  

Updated: Mar 24, 2022, 06:38 PM IST
अरे देवा ! अभिनेत्री स्वरा  भास्कर हिचे सामान घेऊन कॅब ड्रायव्हरचे पलायन  title=

मुंबई : Bollywood Actress Swara Bhasker : बॉलिवूडची अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) हिला मोठा धक्का बसला आहे. ज्या कारमधून प्रवास करत होती. त्या कार चालकाने तिचे सामान घेऊन पलायन केले. ही माहिती स्वराने ट्विट करत दिली.

 स्वरा भास्कर ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. सध्या ती लॉस एंजलिसमध्ये (Los Angeles) आहे. लॉस एंजलिसमध्ये फिरत असताना तिच्यासोबत एक घटना घडली. स्वराने ट्विट करत या घटनेची माहिती दिली. प्रवास करत  असताना सामान घेऊन कॅब ड्रायव्हरचे पलायन केल्याचे तिने या ट्विटमध्ये म्हटले आहे. तिने हे ट्विट करताना उबेरला हॅशटॅग केले आहे.

 स्वराने ट्विटमध्ये उबर या कंपनीच्या उबर सपोर्ट या अकाऊंटला टॅग केले आहे. ट्विटमध्ये स्वराने म्हटले, 'हाय उबेर, लॉस एंजलिसमध्ये एक कॅब ड्रायव्हर माझे सर्व समान घेऊन त्याच्या कारमधून निघून गेला. मी एका प्री- एडेड स्टॉपवर उभी होते. मला याबाबत रिपोर्ट करण्यासाठी अ‍ॅपमध्ये काही फिचर दिसत नाही. माझे समान हरवलेले नाही तर कॅब चालक चक्क घेऊन पळून गेला. मला माझे सामान परत मिळू शकेल का?  त्याचवेळी स्वराने या ट्विटमध्ये #touristproblems या हॅश टॅगचा वापर केला आहे. 

 स्वरा भास्कर हिचा 'शीर कूरमा' ही शॉर्ट फिल्स लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच फराज अन्सारी यांनी दिग्दर्शित केलेल्या एका चित्रपटामध्ये देखील स्वरा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात स्वराहिच्यासोबतच शबाना आझमी आणि दिव्या दत्ता आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x