किडा करू शकतो जगाचा विनाश? संशोधकांनी दिला धोक्याचा इशारा

जगावर विनाशकारी किड्याचं संकट? संशोधकांनी दिला धोक्याचा इशारा 

Updated: Feb 5, 2022, 06:31 PM IST
किडा करू शकतो जगाचा विनाश? संशोधकांनी दिला धोक्याचा इशारा  title=

नवी दिल्ली : कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही. त्यात आता जगावर नवं संकट घोंगावतंय. संशोधकांनी किड्यांच्या घातक प्रजातींचा शोध लावलाय. विशेष म्हणजे या किड्यांचा जगभरात वेगानं प्रसार होत आहे. 

कोरोनाचं संकट कमी झालंय असं वाटत असतानाच आता जगावर नवं संकट घोंगावू लागलंय. हे संकट आहे किड्यांचं आहे. संशोधकांनी अतिशय धोकादायक अशा किड्यांच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावलाय. सध्या तरी हे किडे बागांमध्येच आढळून आले आहेत. 

मात्र जर या किड्यांनी किचनमध्ये प्रवेश केला तर हाहाकार उडू शकतो. त्यांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. या किड्यांचा शोध लागल्यानंतर अवघ्या काही दिवसात तीन देशांमध्ये त्यांच्या प्रजाती आढळून आल्या आहेत. 

फ्लॅटवर्म असं या नव्या संकटाचं नाव आहे. ज्याची लांबी फक्त 3 से.मी. एवढी आहे. पण याच्या सर्वांत मोठ्या प्रजातीतील किड्याची लांबी जवळपास 3 फूटांपर्यंत असू शकते. आत्ता फ्लॅटवर्म ब्रिटिश बागांमध्ये आढळले आहेत. मात्र त्यांच्या वाढीचा वेग पाहता  हे किडे जैव विविधतेसाठी धोकादायक ठरू शकतात. 

रोपांच्या आयात-निर्यातीतून फ्लॅटवर्मच्या 10 पेक्षा जास्त प्रजाती आशियामधून जगभरात पसरत आहे. फ्लॅटवर्मच्या नव्या प्रजाती फ्रान्स, इटली आणि आफ्रिकेच्या बेटांवरही आढळल्या आहेत. गांडूळ आणि गोगलगाय हा या किड्यांचा प्रमुख आहार आहे. जसजसशी उष्णता वाढेल तसा या किड्यांचा प्रसार जास्त होईल अशी भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. 

संशोधकांनी किड्यांची ही नवी प्रजाती प्रचंड घातक असल्याचं म्हंटलं आहे.  आधीच कोरोनानं सारं जग त्रासलंय. त्यात आता या नव्या संकटाचा सामना कसा करायचा ? हाच प्रश्न संशोधकांना पडला आहे.