कारला लागलेल्या आगीत फसलं कपल, पण शेवटच्या क्षणी घडला असा चमत्कार, पाहा व्हिडीओ

कारला लागली भीषण आग पण दैव बलवत्तर म्हणून असा वाचला कपलचा जीव...पाहा थरारक व्हिडीओ

Updated: Sep 9, 2021, 11:07 PM IST
कारला लागलेल्या आगीत फसलं कपल, पण शेवटच्या क्षणी घडला असा चमत्कार, पाहा व्हिडीओ title=

कॅलिफोर्निया: रस्त्यावरून जात असताना कपलच्या कारला भीषण आग लागली. कार आगीत जळत असताना आतमध्ये कपल अडकलं. मात्र दैव बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला आहे. या दुर्घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जर थोडासा जरी उशीर झाला असता तरी हे कपल आगीच्या लोळात आलं असतं आणि पुढची तर कल्पनाच न केलेली बरी असं हा व्हिडीओ पाहून म्हणायला हवं. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की गाडीच्या मागे खूप मोठी आग लागली आहे. आग वेगानं पसरत आहे. त्याचवेळी आजूबाजूला जाणाऱ्या गाड्यांमधील लोकांनी खाली उतरून या दुर्घटनाग्रस्त गाडीतील कपलचा जीव वाचवला आहे. घटनास्थळावरील लोकांनी वृद्ध कपलला रेस्क्यू करून त्यांचा जीव वाचवला. त्यांनंतर आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली. 

या घटनेचा थरारक व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लेकसाइड फायर डिस्ट्रिक्टने शेअर केला आहे. आग लागलेल्या या कारमध्ये वृद्ध कपल होते. तिथल्या प्रवाशांनी धैर्य दाखवून या कपलला वाचवलं.

7 सप्टेंबरला हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला 2 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या दुर्घटनेचा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून आपल्याला साधारण कल्पना येऊ शकते की आग किती भयंकर होती ते.