Salt Baeच्या रेस्टॉरंटचे बिल पाहून लोकांचा वाढला बीपी; फक्त फ्रेंच फ्राईजसाठी घेतले 'इतके' लाख

अनेकदा काही लोक रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला जातात तेव्हा त्याची किंमत किती आहे पाहायला विसरतात. मात्र बिल आल्यानंतर अनेकांचे डोळे पांढरे होतात. असाच काहीसा प्रकार अबू धाबीत घडलाय. अबू धाबीतल्या एका रेस्टॉरंटमध्ये एका ग्राहकाला चक्क 1.36 कोटी रुपयांचे बिल हातात देण्यात आलंय. पण आश्चर्याची बाब म्हणजे त्या व्यक्तीने हे बिल आनंदात भरलयं. हा सर्व प्रकार घडलाय सॉल्ट बे (Salt Bae) याच्या सेलेब्रिटी रेस्टॉरंटमध्ये.

Updated: Nov 21, 2022, 03:02 PM IST
Salt Baeच्या रेस्टॉरंटचे बिल पाहून लोकांचा वाढला बीपी; फक्त फ्रेंच फ्राईजसाठी घेतले 'इतके' लाख title=

Salt Bae : अनेकदा काही लोक रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला जातात तेव्हा त्याची किंमत किती आहे पाहायला विसरतात. मात्र बिल आल्यानंतर अनेकांचे डोळे पांढरे होतात. असाच काहीसा प्रकार अबू धाबीत घडलाय. अबू धाबीतल्या एका रेस्टॉरंटमध्ये एका ग्राहकाला चक्क 1.36 कोटी रुपयांचे बिल हातात देण्यात आलंय. पण आश्चर्याची बाब म्हणजे त्या व्यक्तीने हे बिल आनंदात भरलयं. हा सर्व प्रकार घडलाय सॉल्ट बे (Salt Bae) याच्या सेलेब्रिटी रेस्टॉरंटमध्ये.

1.36 कोटी रुपयांचे बिल

टर्कीतील सेलिब्रिटी शेफ नुस्र अत कोक्से उर्फ ​​सॉल्ट बे याच्या अबू धाबीमधील एका रेस्टॉरंटचे (Nusr-Et restaurants) बिल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अबू धाबीमधील अल मेरीह बेटावरील द गॅलेरिया या रेस्टॉरंटचे बिल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिलाची रक्कम पाहून लोक हैराण झाले आहेत. सॉल्ट बाईने शेअर केलेल्या बिलाची रक्कम सुमारे 1.36 कोटी रुपये आहे. सॉल्ट बे याआधी 2017 मध्ये सोशल मीडियावर एक मीम व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्धीझोतात आला होता. विशिष्ट पद्धतीने मीठ घालून जेवण बनवण्याच्या त्याच्या कौशल्यामुळे तो सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्ध झाला. सध्या त्याच्याकडे जगातील सर्व प्रमुख शहरांमध्ये रेस्टॉरंट्सची साखळी आहे. 2021 मध्ये, लंडनमधील त्याच्या रेस्टॉरंटच्या महागड्या मेनूंच्या किंमती पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. अबू धाबीतील या रेस्टॉरंटमधील किमतीही अशाच काही आहेत.

6.5 लाखांचा फक्त व्हॅट

नुस्र अत कोक्से याने इंस्टाग्रामवर त्यांच्या युएईच्या रेस्टॉरंटमध्ये एका ग्राहकाला दिलेल्या 615,065 दिरहम (जवळपास 1.36 कोटी) बिलाचा फोटो शेअर केला आहे. त्यावर सॉल्ट बे कॅप्शन म्हणून गुणवत्ता कधीही महाग नसते, असेही म्हटले आहे. बिलामध्ये अंदाजे 6.5 लाखाचा व्हॅट (कर) आकारण्यात आला होता. पण या बिलामध्ये सेवा शुल्क समाविष्ट करण्यात आले नव्हते.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nusr_et#Saltbae (@nusr_et)

ग्राहकाने नक्की खायला काय मागवलं होतं?

या ग्राहकाच्या बिलामध्ये महागडी वाईन बोरदेयॉक्स, बकलावा आणि सिग्नेचर गोल्ड प्लेटेड  इस्तंबूल स्टिक यांचा समावेश आहे. यामध्ये फक्त 4 मित्रांनी मिळून 4000 डॉलर किमतीचे फक्त फ्रेंच फ्राईज खाल्ले आहेच. हेच 200 ग्रॅम फ्रेंच फ्राईज 40 रुपयांना रस्त्याच्या कडेला मिळतात. रेस्टॉरंटच्या वेबसाईटनुसार इथे बेसिक डिनरसाठी जेवण ऑर्डर केलं तर एका व्यक्तीचं किमान 19,000 रुपये बिल होते. सॉल्ट बे हा मटणात सोन्याचे वर्क टाकून लोकांना देतो आणि पहिला तुकडा हाताने खाऊ घालतो,.पण यासाठी तुम्हाला 10 लाख रुपये द्यावे लागतात.