चीनने तिबेटमध्ये जमा केला हजारो टन हत्यारांचा साठा

सिक्किम सीमेवर भारतासोबत वाद सुरू असताना चीनने तिबेटमध्ये हजारो टन हत्यारांचा साठा जमा केला आहे. चीनी सेनेचं मुखपत्र असलेल्या PLA डेलीने याबाबतचा खुलासा केला आहे.

Updated: Jul 20, 2017, 12:25 PM IST
चीनने तिबेटमध्ये जमा केला हजारो टन हत्यारांचा साठा title=

नवी दिल्ली : सिक्किम सीमेवर भारतासोबत वाद सुरू असताना चीनने तिबेटमध्ये हजारो टन हत्यारांचा साठा जमा केला आहे. चीनी सेनेचं मुखपत्र असलेल्या PLA डेलीने याबाबतचा खुलासा केला आहे.

चीनी सैन्याने जूनच्या अखेरापासून तिबेटमध्ये हत्यारांचा साठा जमा करण्यास सुरूवात केली आहे. रेल्वेनेदेखील हत्यारं त्याठिकाणी पोहचवली जात आहेत. भारतासोबत असलेला सीमावाद पाहता चीनी सेनेच्या वेस्टर्न थियेडर कमांडरने उत्तर तिबेटच्या कुनलुन डोंगरावर सारी रसद जमा केली.

डोकलामध्ये भारतावर दबाब आणण्यासाठी चीनने ही रणनिती आखली आहे. महिन्याभरापासून दोन्ही देशांचं सैन्य एकमेकांसमोर उभं ठाकलं आहे. विदेश सचिव एस जयशंकर यांनी दोन दिवसांपूर्वी संसदीय समितीला डोकलामसंदर्भातील अहवाल दिला होता. मात्र या अहवालात सीमेवरील तणावाचा उल्लेख नाही.