पाकिस्तान दहशतवाद्यांच्या यादीत, भारताला मोठे यश

अमेरिकेने पाकिस्तानला जोरदार दणका दिलाय. दहशतवाद्यांना आश्रय देणारे देश आणि प्रदेशांच्या यादीत अमेरिकेने पाकिस्तानच्या नावाचा समावेश केलाय. ही बाब भारतासाठी आनंदाची आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 19, 2017, 11:59 PM IST
पाकिस्तान दहशतवाद्यांच्या यादीत, भारताला मोठे यश title=

वॉशिंग्टन : अमेरिकेने पाकिस्तानला जोरदार दणका दिलाय. दहशतवाद्यांना आश्रय देणारे देश आणि प्रदेशांच्या यादीत अमेरिकेने पाकिस्तानच्या नावाचा समावेश केलाय. ही बाब भारतासाठी आनंदाची आहे.

लश्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटना पाकिस्तानात मुक्तपणे वावरत आहेत. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यापासून ते निधी उभारण्याचे काम राजरोसपणे सुरु आहे. ही बाब लक्षात घेऊनच पाकिस्तानला दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशांच्या यादीत टाकण्यात आल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आलेय.

दरम्यान, पाकिस्तानात सातत्याने दहशतवादाला थारा दिल्याचे अनेक पुरावे भारताने सादर केले होते. तसेच पाकिस्तानलाही दिले होते. मात्र, पाकिस्तानने ते फेटाळले होते. तसेच भारताने सातत्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर ही बाब उपस्थित केली होती. पाकिस्तान हा दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश म्हणून घोषित करावे, अशी मागणीही भारताने केली होती. आता अमेरिकेनेने यादीच जाहीर केल्याने भारतासाठी ही मोठी घटना मानली जात आहे.