डोकलाम वादावर चीनचं एक पाऊल मागे...

गेल्या आठवड्यात मीडियाच्या माध्यमातून भारताला धमक्या देणारं चीन आता मात्र मागे हटायला तयार झालंय. 

Updated: Aug 15, 2017, 08:46 AM IST
डोकलाम वादावर चीनचं एक पाऊल मागे...  title=

डोकलाम : गेल्या आठवड्यात मीडियाच्या माध्यमातून भारताला धमक्या देणारं चीन आता मात्र मागे हटायला तयार झालंय. 

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीनं (पीएलए) डोकलामच्या वादग्रस्त स्थानापासून १०० मीटर मागे हटायला तयारी दर्शवलीय. परंतु, चीनी सेनेनं वादग्रस्त स्थानापासून २५० मीटरपर्यंत मागे हटावं, तरच भारतीय सेना मागे जाईल, असं भारतानं स्पष्ट केलंय. 

संघर्षाऐवजी दोन्ही देशाच्या सैनिकांनी मागे हटण्याची भूमिका घेतलीय. 

दरम्यान, चीनी मीडियातून भारतासाठी धमक्यांचं सत्र सुरूच आहे. सरकारी वर्तमानपत्र चायना डेली आणि ग्लोबल टाइम्स यांच्या म्हणण्यानुसार, भारताला आपली सेना मागे घ्यावी लागेल, अन्यथा त्यांना युद्धाला सामारं जावं लागेल.