Job News: 8 तासांच्या शिफ्टमध्ये 6 तास तो Toilet मध्येच बसायचा! कंपनीची सटकली अन्...

Man Spent 6 Hours A Shift In Toilet: कंपनीविरोधात कर्मचारी कोर्टात गेला असता संबंधित कंपनीने या कर्मचाऱ्याने किती वेळ टॉयलेटमध्ये घालवला याची संपूर्ण आकडेवारीच कंपनीकडून आपला युक्तीवाद करताना कोर्टासमोर मांडण्यात आली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 1, 2023, 04:09 PM IST
Job News: 8 तासांच्या शिफ्टमध्ये 6 तास तो Toilet मध्येच बसायचा! कंपनीची सटकली अन्... title=
प्रकरण थेट कोर्टात गेलं

Man Fired For Spending 6 Hours In Toilet: कामाच्या वेळेस कामच झालं पाहिजे अशी अट अनेक ठिकाणी असते. अनेकदा कामाच्या वेळात कर्मचारी टंगळमंगळ करताना दिसले तर त्यांच्यावर कठोर कारवाईही केली जाते. मात्र चीनमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला असून येथे शिफ्टच्या टाइममध्ये दिवसातील 6 तास वॉशरुममध्ये घालवणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. हे प्रकरण थेट कोर्टात गेलं असून कोर्टाने ही निलंबनाची कारवाई योग्य असल्याचंही म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

वँग नावाच्या कर्मचाऱ्याने एप्रिल 2006 मध्ये कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एप्रिल 2013 पासून हा कर्मचारी कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता. त्यानंतर त्याने 2014 साली आपल्या गुदद्वारेजवळ जखम झाल्याने उपचारांसाठी सुट्टी घेतली. त्यानंतर त्याने आपल्याला शौचालयाला जाण्यासंदर्भातील समस्या असल्याचं सांगितलं. यशस्वी शस्त्रक्रीया झाल्यानंतरही आपल्याला फारच त्रास होत असल्याचा दावा वँगने केला. याच त्रासामुळे वँग दिवसातील 3 ते 6 तास वॉशरुममध्ये घालवायचा. हे सारं जुलै 2015 पासून सुरु होतं.

कधी कधी 3 तास टॉयलेटमध्ये

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर 7 आणि 17 सप्टेंबर 2015 दरम्याच्या कालावधीमध्ये वँग दररोज जवळजवळ 22 वेळा टॉयलेटला गेलेला. या कालावधीमध्ये तो किमान 47 मिनिटं ते जास्तीत जास्त 196 मिनिटं म्हणजेच 3 तासांहून अधिक वेळ टॉयलेटमध्ये होता असं कंपनीने म्हटलं आहे.

कामावरुन काढलं अन् तो कोर्टात गेला

यानंतर कंपनीने 23 सप्टेंबर 2015 रोजी वँगला कामावरुन काढून टाकलं. यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या नियमांचा आधार घेतला. जास्त वेळ जागेवर नसणे, कामावरुन लवकर निघून जाणे यासारख्या कारणांअंतर्गत केली जाणारी कारवाई कंपनीने केली. यानंतर वँगने कंपनीविरोधात कोर्टात धाव घेतली. आपल्याला कंत्राट पद्धतीने कंपनीने कामावर ठेवावं अशी मागणी वँगने केली होती. मात्र कोर्टाने कंपनीची भूमिका योग्य असल्याचं सांगत कारवाई नियमांना धरुन असल्याचं स्पष्ट केलं.

सोशल मीडियावर तुफान चर्चा

चीनमधील सोशल मीडियावर या प्रकरणाची चांगलीच चर्चा आहे. अनेकांनी अशाप्रकारे गैरफायदा घेणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. 8 तासांच्या शिफ्टमध्ये एखादी व्यक्ती 6 तास वॉशरुममध्ये असेल तर कंपनी काय करणार? असा प्रश्न एकाने विचारला आहे. तर अन्य एकाने या व्यक्तीने कंपनीला एकाप्रकारे लुबाडलच असल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. कंपनीने दिलेल्या सवलतींच्या गैरफायदा कसा घेऊ नये याचं हे उत्तम उदाहरण असल्याचंही काहींनी म्हटलं आहे.