Hottest Year 2024: आपल्या सौरमंडळातील महत्वाचा ग्रह पृथ्वीसाठी अत्यंत गंभीर काळ सध्या सुरु आहे. 'बायोसायन्स पत्रिका' मध्ये प्रकाशित नव्या रिपोर्टमध्ये यासंदर्भात दावा करण्यात आला आहे. पृथ्वीवरील जनता सध्या अपरिवर्तनीय जलवायू संकटाच्या उंबरठ्यावर आहे. आपलं होम प्लॅनेट म्हणजेच पृथ्वीने हवामान संकटाच्या महत्वपूर्ण टप्प्यात प्रवेश केलाय. ज्यामध्ये ग्रहांसाठी धोक्याचे 35 संकेत असून 25 च्या सीमा पार केल्या आहेत.
ओरेगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांचा समूह दरवर्षी रिपोर्ट जारी करतो. ज्यामध्ये यंदाच्या रिपोर्टचे नाव जलवायू रिपोर्ट 2024 ची स्थिती: पृथ्वीवर खतरनाक वेळ' असे आहे. या रिपोर्टच्या निष्कर्षानुसार पृथ्वीचे महत्वपूर्ण संकेट बिघडत चालले आहेत. हा निर्णायक कार्यवाहीचा वेळ आहे. या महत्वपूर्ण संकेतामध्ये लोकसंख्या विस्फोट, जीडीपी, जुगाली करणाऱ्या प्राण्यांची संख्या, प्रति व्यक्ती मांस उत्पादन आणि कोळसा, तेलाचा खप यांचा समावेश आहे.
रिपोर्टनुसार, मानव आणि पशुधनच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मानवी लोकसंख्या 2 लाख तर पशुधन संख्या 1 लाख 70 हजार प्रति दिवस अशा वेगाने वाढत आहे. जीवाश्म इंधनाचा खप वेगाने वाढत असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. यामध्ये 2023 मध्ये कोळसा आणि तेलाच्या उपयोगात 1.5 टक्के वाढ होईल. असे असताना अक्षय उर्जेमध्ये वर्षाला काही प्रमाणात वाढ दिसून आली आहे. जीवाश्म इंधनाचा खप वायू आणि सौर उर्जेच्या तुलनेमध्ये 14 टक्के अधिक वाढल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर जागतिक वृक्षाच्छादन देखील 2022 मधील वार्षिक 28.3 मेगा हेक्टरवरून यावर्षी 22.8 मेगा हेक्टरपर्यंत कमी होईल, असे म्हंटले आहे. केवळ जंगलातील आगीमुळे 11.9 मेगा हेक्टर वृक्षांचे विक्रमी नुकसान झाले आहे, असे अहवालात म्हटले आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, वृक्षाच्छादित नुकसानीच्या उच्च दरांमुळे जंगलातील कार्बन पृथ्थकरणात कमी येते. ज्यामुळे अतिरिक्त ग्लोबल वार्मिंग होते. दुसरीकडे हरितगृह वायू उत्सर्जनदेखील खूप जास्त नोंदवले गेले आहे.
चीन, भारत आणि अमेरिका हे हरितगृह वायूंचे सर्वाधिक उत्सर्जन करणारे देश आहेत. तर यूएई, सौदी अरेबिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये दरडोई हरितगृह वायू उत्सर्जन सर्वाधिक आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी जागतिक पृष्ठभागाचे तापमान सर्वाधिक होते. हे लक्षात घेता 2024 हे वर्ष रेकॉर्डवरील सर्वात उष्ण वर्षांपैकी एक असू शकते. नोव्हेंबर 2023 ते ऑगस्ट 2024 दरम्यान जगात 16 भयानक हवामान आपत्ती आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाल्याचे अहवालात तपशीलवार नमूद केले आहे.