मुंबई : Earth temperature : आता एक बातमी चिंता वाढणारी. येत्या काही वर्षात प्रचंड उष्णता वाढण्याची शक्यता आहे. तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पृथ्वीला याचा धोका वाढला आहे. पृथ्वीला तीन डिग्री तापमानवाढीचा चटका बसणार आहे. याबाबत आयपीसीसीच्या अहवालातील भीती व्यक्त करण्यात आली आहे. 2025 मध्ये हे तापमान प्रत्येकाला भाजून काढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पृथ्वीच्या तापमानातील वाढ दीड डिग्रीइतकीच (warm up an average of 3 degrees Celsius) रोखून धरण्याचा जगभरातील अभ्यासक आणि राज्यकर्त्यांनी एकत्र येऊन केलेला निर्धार व्यर्थ जाईल अशी भीती आहे. येत्या 2025 मध्येच हा दीड डिग्रीचा टप्पा गाठला जाईल आणि त्यापुढच्या काही वर्षांमध्ये त्याच्या दुप्पट 3 डिग्री इतके तापमान वाढू शकेल, अशी भीती आयपीसीसीने व्यक्त केली आहे.
3 degrees थ्री डिग्री तापमानवाढीमुळे विनाशकारीचे संकेत मिळत आहेत. पृथ्वीच्या एक चतुर्थांश प्रजाती अशा परिस्थितीत नामशेष होऊ शकतात किंवा त्या मार्गाने जाऊ शकतात.
पृथ्वीच्या तापमानातील वाढ हा दीड डिग्रीचा टप्पा गाठला जाईल आणि त्यापुढच्या काही वर्षांमध्ये त्याच्या दुप्पट 3 डिग्री इतके तापमान वाढू शकेल, अशी भीती इंटरगव्हर्न्मेटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजने सोमवारी जारी केलेल्या सहाव्या अहवालात व्यक्त केली आहे.
गेल्या दशकात प्रति जीडीपी ऊर्जेचा वापर 2 टक्क्यांनी कमी झाला. पण त्याचा फायदा झाला नाही. उद्योग आणि जीवाश्म इंधनामुळे होणारे कार्बन उत्सर्जन 1990 ते 2019 पर्यंत 65 टक्के वर पोहोचले आहे.2019 हरितगृह-वायू-उत्सर्जन 59 अब्ज मॅट्रिक टनांच्या नवीन उच्चांकावर पोहोचला आहे. तर फ्लोरिनेटेड गॅसेस 2 टक्के, नायट्रस-ऑक्साइड 4 टक्के, तर मिथेनचा वापर 18 टक्क्यांनी वाढला आहे. 2010-19 पर्यंत हरितवायू उत्सर्जन वाढले असले तरी ते 2009 पर्यंतच्या सरासरीपेक्षा कमी आहे.
जीवाश्म इंधनाचे उत्सर्जन थांबवावे लागेल.
पॅरिस करारात 2030 चे प्राथमिक आणि 2025 पर्यंतचे ठेवलेले लक्ष्य आता 2025 ते 2040 पूर्वी गाठावे लागेल.
हरितवायू आणि कार्बन उत्सर्जन 2030 पर्यंत निम्मे करण्याची आवश्यकता आहे.
हरितवायूचे उत्सर्जन 2030 पर्यंत 43 टक्के आणि 2050 पर्यंत 84 टक्के खाली आणावे लागेल.
हरितवायू उत्सर्जन कमी होऊ शकतो हे 18 देशांनी दाखवून दिले, ही सकारात्मक बाब आहे.