World News : 'कधी एकेकाळी एक मोठालं जहाज समुद्रात बुडालं आणि वर्षानुवर्षे ते तिथंच राहिलं. मग ते जेव्हा समुद्रातून वर काढलं, तर पाहतो तर काय...', ही कोणा एका काल्पनिक गोष्टीची सुरुवात नसून, प्रत्यक्षात घडलेल्या घडनेचाच हा संदर्भ आहे. कोलंबियातील सरकारनं 315 वर्षांपूर्वी कॅरेबियन समुद्रात बुडालेल्या एका जहाजाच्या अवशेषांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे.
कैक वर्षांपूर्वी समुद्राच्या तळाशी गेलेल्या या सॅन होजे नावाच्या जहाजासोबत सोन्याचांदीचे साठे आणि 1 लाख 66 हजार कोटी डॉलर इतक्या किमतीचा 200 टनचा खजिनाही समुद्रात गेला. उपलब्ध माहितीनुसार 1708 मध्ये किंग फिलिप पाचवे यांच्या कार्यकाळामध्ये पहिल्यांदाच या जहाजाचं जलावतरण झाल्याचं म्हटलं जातं.
सॅन होजे जहाजाचे अवशेष पवित्र मानले जातात. ज्यामुळं स्पेन, कोलंबिया आणि बोलिवीया या देशांतील समुदायांमध्ये यामुळं वादाची ठिणगीही पडल्याचं पाहायला मिळतं. बोलीवियातील समुदायानं केलेल्या दाव्यानुसार त्यांच्यावर या जहाजावरील खजिना शोधण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता ज्यामुळं आता त्यावर त्यांचाच हक्क आहे.
तिथं ग्लोका मोरा नावाच्या एका अमेरिकन बचाव पथकानंही 1981 मध्ये हे जहाज शोधल्याचा दावा केला होता. जहाजावरील अर्ध्या संपत्तीची मालकी आपल्याला देण्यात यावी याच अटीवर त्यानं जहाजाच्या मूळ ठिकाणाची माहिती दिली होती. बरीच वर्ष लोटली, ज्यानंतर 2015 मध्ये कोलंबियातील नौदरलानं जहाजाचे अवशेष असणारं दुसरं ठिकाण शोधल्याचा दावा केला होता. दरम्यान, आता राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी 2026 मध्ये आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी जहाजाचे अवशेष समुद्रातून बाहेर काढण्याचा मानस बाळगला आहे. ज्यामुळं आता कोलंबियातील या जहाजाकडेच संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, मागील वर्षी काही Divers कडून या जहाजाच्या अवशेषांसंदर्भातील महत्त्वपूर्म माहिती आणि काही छायाचित्र जगासमोर आली होती. यामध्ये हजारो समुद्री जीवांमध्येच सोन्याची नाणी, सळ्या, विटा आणि चीनी बनावटीची भांडी तिथं आढळली. इतकंच नव्हे, तर डॉल्फीनचे ठसे असणाऱ्या बंदुकासुद्धा तिथं दिसल्याचं सांगण्यात आलं.
असं म्हणतात की सॅन होजे हे जहाज 8 जून 1708 ला 600 लोकांसह समुद्राच्या तळाशी गेलं. 16 ते 18 व्या शतकादरम्यान युरोप आणि अमेरिकेत प्रवास करणाऱ्या जहाजांमध्ये या जहाजाचाही समावेश होता. अपघात होण्याच्या आधीच्या प्रवासावेळी हे जहाज अमेरिकेहून स्पेनला निघालं होतं. यामध्ये असणाऱ्या खजिनाचा वापर स्पेन ब्रिटनविरोधातील लढ्यामध्ये करण्यार होते. पनामा पोर्टोबेलोतूनहे जहाज जात असतानाच त्याचा सामना ब्रिटीश स्क्वाड्रनशी झाला. ज्यानंतर त्यात असणाऱ्या सर्व सामानाचा ताबा घेण्याचं ब्रिटीशांनी ठरवलं. पण, जहाजावर असणाऱ्या पावडर मॅग्जिनमध्ये स्फोट झाला आणि त्याला जलसमाधी मिळाली.