वॉशिंग्टन : जगात कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढताना दिसत आहे. मात्र, यातच एक चांगली हाती आली आहे. जगातील 13 देश कोरोना मुक्त झाले आहेत. (Corona-free 13 countries in the world) दरम्यान, असे असले तरी चिंतेची बाब म्हणजे 131 देशांमध्ये कम्युनिटी ट्रान्समिश होत असल्याचे पुढे आले आहे.
असमान कोविड -१९ लस धोरणांमुळे जगाला ‘आपत्तीजनक नैतिक अपयशा’ला तोंड द्यावे लागले आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटले आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रॉस गेब्रेयसिस ( WHO chief Tedros Adhanom Ghebreyesus) म्हणाले की, श्रीमंत देशातील लहान आणि चांगल्या लोकांसाठी हे चांगले नाही की, गरीब राज्यांमधील असुरक्षित लोकांसमोर इंजेक्शन घेणे योग्य नाही.
ते म्हणाले की 49 श्रीमंत राज्यांत 39 दशलक्षपेक्षा जास्त लस डोस देण्यात आले आहेत. परंतु एका गरीब देशाला फक्त 25 डोस आहेत. दरम्यान, डब्ल्यूएचओ आणि चीन या दोघांवर त्यांच्या कोविड प्रतिसादाबद्दल टीका झाली.
जगातील 13 देशांना जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनामुक्त म्हणून जाहीर केले आहे. मात्र या देशांमध्ये खबरदारी घेणे आवश्यक आहे असं WHO ने (World Health Organization) म्हटले आहे. चिंतेची बाब म्हणजे 131 देशांमध्ये कम्युनिटी ट्रान्समिश होत आहे असं WHO नं जाहीर केले आहे. या 131 देशांच्या यादीत पाकिस्तान, अमेरिका, ब्राझिल, ब्रिटन, फ्रान्स यांचा समावेश आहे.
भारत सध्या क्लस्टर ऑफ केसच्या श्रेणीत आहे. म्हणजे अजून भारतात कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरूवात झालीय. जगात जानेवारीच्या या 18 दिवसांत सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळलेत, तसेच सर्वात जास्त मृत्यूही झालेत. 8 जानेवारीला जगात तब्बल 8 लाखांहून अधिक रुग्ण आढळले. यापूर्वी इतके रुग्ण कधीच सापडलेले नव्हते. त्याचप्रमाणे 13 जानेवारी रोजी सर्वाधिक 16 हजार 537 लोकांनी आपला जीव गमावला.