लंडन : Corona New Variant : कोरोनाचा (Coronavirus) धोका कमी होण्याचे नाव घेत नाही. आता कोरोनाचा नवा व्हेरियंट (Corona New Variant) सापडला आहे. कोलंबियात सापडलेल्या कोरोनाच्या म्यू व्हेरियंटमुळे जागतिक आरोग्य संघटनेची चिंता वाढली आहे. कारण लसीचा यावर प्रभाव कमी पडत असल्याने या नव्या व्हेरियंटचा धोका वाढू शकतो. त्यामुळे याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठीण होऊ शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेचे World Health Organisation (WHO) म्हणणे आहे. 39 देशांमध्ये म्यू व्हेरियंटचा (New Strain - Mu ) प्रसार झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.
कोलंबियात सापडलेल्या कोरोनाच्या म्यू व्हेरियंटमुळे जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) चिंता वाढली आहे. या व्हेरियंटवर लशींची परिणामकारकता कमी आहे. बी. 1.621 असे या म्युटंटचे शास्त्रीय नाव आहे. म्यू (New Strain - Mu ) या व्हायरसचा जागतिक प्रसार 0.1 टक्का असला तरी कोलंबिया, इक्वेडोर यासह दक्षिण अमेरिका. युरोपमध्येही तो पसरु लागला आहे. 39 देशांमध्ये हा विषाणू सापडल्याने जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
म्यू या विषाणूचा जागतिक प्रसार 0.1 टक्के असला तरी कोलंबियात 39 टक्के आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत या प्रकाराचा समावेश 30 ऑगस्टला करण्यात आला. याचा प्रसाराचा वेग अधिक आहे. त्यामुळे कोरोना लसीवर परिणाम होत नाही. दरम्यान, याबाबतचे अधिक संशोधनच त्यावर प्रकाश टाकू शकेल, असेही प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे.
मार्चपासून जागतिक आरोग्य संघटनेच्या निरीक्षणाखाली असलेला म्यू हा पाचवा ‘निरीक्षणाधीन उत्परिवर्तन’ आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार जगभरात कोरोना विषाणूमुळे आतापार्यंत 45 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.