Corona Vaccine : Norwayमध्ये व्हॅक्सिन घेतल्यानंतर 13 जणांचा मृत्यू

अनेक देशांमध्ये कोरोनाव्हायरसवर  (Coronavirus) उपचार म्हणून लोकांना लस (Corona Vaccine) टोचण्यात येत आहे, परंतु यादरम्यान 'फायझर लस'बाबत  (Pfizer Vaccine) प्रश्न उपस्थित केले जात आहेत.  

Updated: Jan 15, 2021, 03:07 PM IST
Corona Vaccine : Norwayमध्ये व्हॅक्सिन घेतल्यानंतर 13 जणांचा मृत्यू title=

ओस्लो : जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाव्हायरसवर  (Coronavirus) उपचार म्हणून लोकांना लस (Corona Vaccine) टोचण्यात येत आहे, परंतु यादरम्यान 'फायझर लस'बाबत  (Pfizer Vaccine) प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण नॉर्वेत  (Norway) याचे मोठे दुष्परिणाम दिसून येत आहेत. आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत 33 हजार लोकांना दिली लस 

नवीन वर्षाच्या 4 दिवस आधी नॉर्वेमध्ये (Norway) फायझर लस आणली गेली होती आणि 67 वर्षीय स्विन अँडरसनला प्रथम लस दिली गेली होती. त्यानंतर आतापर्यंत 33 हजार लोकांना लस देण्यात आली आहे. लसीकरण सुरू झाल्याने काही लोकांना याचे दुष्परिणाम होतील, असे जाहीर करण्यात आले होते.

29 लोकांमध्ये साइड इफेक्ट

रशियन वृत्तसंस्था स्पुतनिकच्या अहवालानुसार नॉर्वेजियन औषध एजन्सीने असे म्हटले आहे की 29 लोकांवर साइड इफेक्ट दिसून आले आहेत, तर लसीकरणानंतर आतापर्यंत 23 लोकांचा मृत्यू झाला आहे. तथापि, अद्याप यापैकी 13 जणांचा तपासनी करण्यात येत आहे. मेडिसिन एजन्सीचे वैद्यकीय संचालक स्टीनर मॅडसेन यांनी देशातील राष्ट्रीय प्रसारक एनआरकेशी बोलताना सांगितले की, “13 मृत्यूंमध्ये गंभीर दुष्परिणामांच्या 9 घटना समोर आल्या आहेत.”

मृत्यूची संख्या 80 वर्षांपेक्षा जास्त आहे

संचालक स्टीनर मॅडसेन म्हणाले, "तपासात असे आढळले आहे की मृत्यू पावलेले बहुतेक लोक दुर्बल किंवा वृद्ध होते जे नर्सिंग होममध्ये राहत होते." मृतांचे वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि त्यातील काही 90 वर्षांपेक्षा जास्त आहेत. ते म्हणाले, 'असे दिसते की यापैकी काही जणांना कोरोना लस मिळाल्यानंतर ताप आणि अस्वस्थता होती. यानंतर ते गंभीर आजारी पडलेत आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

साइड इफेक्टची प्रशासनाला चिंता नाही

मॅडसेन यांनी ठामपणे सांगितले की, 'ही प्रकरणे दुर्मिळ आहेत आणि हजारो लोकांना कोणत्याही गंभीर परिणामाशिवाय लस दिली गेली आहे. याचा अर्थ असा की ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यात ते हृदयाशी संबंधित आजार, डायमेन्सिया आणि इतर अनेक गंभीर आजारांनी पीडित होते. ते पुढे म्हणाले, आतापर्यंत पुष्टी झालेल्या दुष्परिणामांबाबत प्राधिकरणाची चिंता नाही. हे स्पष्ट आहे की काही आजारी लोकांव्यतिरिक्त या लसीचा धोका कमी आहे.