जगभरात नव्या कोरोना व्हायरसची दहशत, आतापर्यंत 28 लक्षणं आली समोर

कोरोनाचे आणखी लक्षणं आली समोर

Updated: Dec 24, 2020, 06:29 PM IST
जगभरात नव्या कोरोना व्हायरसची दहशत, आतापर्यंत 28 लक्षणं आली समोर

मुंबई : कोरोना (Corona) विषाणूचा नवीन प्रकार आढळल्याने वैज्ञानिकांच्या आव्हानांमध्ये वाढ झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर आतापर्यंत 8 ते 10 वेगवेगळी लक्षणं दिसत होती. पण यूकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल एक्सलन्सने अलीकडेच कोरोना संसर्गाची 28 लक्षणे ओळखली आहेत. (new symptoms of corona virus)

व्यापक संशोधनानंतर कोरोना विषाणूचा नाश करण्यासाठी वैज्ञानिक लस विकसित करत आहेत. कोरोना विषाणूचे दुष्परिणाम आणि त्याच्या लक्षणांबद्दल आणखी नवीन माहिती समोर येत आहे. कोरोना विषाणूचे लोकांवर वेगवेगळे परिणाम होत आहेत. एखाद्याला फक्त ताप येत असेल तर दुसऱ्याला श्वासोच्छवासाबरोबरच इतर समस्या देखील आहेत. एनआयसीने कोविड -19 च्या 28 लक्षणांची यादी 18 डिसेंबर रोजी सार्वजनिक केली होती.

कोरोना संसर्गापासून बरे झालेले लोकही विविध प्रकारच्या समस्या अनुभवत आहेत. बहुतेक लोक म्हणतात की कोरोना संसर्गापासून मुक्त झाल्यानंतरही सुस्तपणा बराच काळ टिकून राहतो. तज्ञ म्हणतात की कोविड -19 (Covid-19) जास्त काळ टिकतो. किरकोळ लक्षणे दिसू लागल्यास हा रोग सुरुवातीला तीव्र होऊ शकतो. कोरोनामधून बरे झाल्यानंतरची लक्षणे अधिक चिंताजनक आहेत.

ओएनएस ने सांगितले की, कोरोना संसर्गाची लक्षणे पाच लोकांपैकी एकामध्ये पाच आठवडे किंवा त्याहून अधिक काळ राहू शकतात. दुसऱ्या अहवालात ओएनएसने म्हटले आहे की, कोविड -19 ची लक्षणे 10 पैकी एका व्यक्तीमध्ये 12 आठवड्यांपर्यंत असू शकतात.

कोरोनाची 28 लक्षणे

श्वास घेतांना त्रास, कोरडा खोकला, धाप लागणे, ह्रदयाचा त्रास होणे, छातीत दुखणे, धडधडणे, छातीत घट्टपणा, न्यूरोलॉजिकल, स्मरणशक्ती कमी होणे, झोप येणे, डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्त होणे, लैंगिकदृष्ट्या अकार्यशील, मळमळ, अतिसार, भूक न लागणे, पोटदुखी. वेदना, स्नायुंचा त्रास, सांधेदुखी, स्नायू दुखणे, मानसिक त्रास, नैराश्य, एंजाइमॅटिक, ईएनटी, वास न जाणवणे, घसा खवखवणे, कानात सतत आवाज,  कान दुखणे, चक्कर येणे, त्वचेवर पुरळ उठणे, थकवा, वेदना, ताप.