करीमा बलोचच्या हत्येवर प्रश्न; ISI कडे शंकेची सुई

करीमाला येत होते धमकीचे फोन

Updated: Dec 24, 2020, 08:43 AM IST
करीमा बलोचच्या हत्येवर प्रश्न; ISI कडे शंकेची सुई  title=

मुंबई : बलोच महिला ऍक्टिविस्ट करीमा बलोच (Karima Baloch) ची हत्या झाली. करीमा एका दुर्घटनेची शिकार झाली. या घटनेला घडून बराच काळ लोटला. कॅनडा पोलिसांनी प्राथमिक तपासात हत्येच्या संशयाला नाकारलं आहे. मात्र करीमाचे पती, बलोचचे ऍक्टिविस्ट हम्माल हैदरने ही हत्या (ISI)  असल्याचा संशय व्यक्त केला आहे. 

परदेशात हत्या झालेली दुसरी बलोच व्यक्ती 

करीमा दुसरी बलोच आहे जिची परदेशात संशयी परिस्थितीत मृत्यू झाला आहे. या अगोदर स्वीडनमध्ये राहणारी बलोच पत्रकार साजिद हुसैन (Sajid Hussain) मार्च महिन्यात गायब झाली. आणि १ मे रोजी तिचा मृतदेह सापडला. या दोन्ही हत्येत अनेक समान गोष्टी आहेत. 

दोघांना डुबून मारण्याची शंका 

साजिदच्या कुटुंबियांनी स्विडन सरकारकडे तपासाची मागणी केली आहे. मात्र अद्याप तपासाचा रिपोर्ट आलेला नाही. दोन्ही प्रकरणात व्यक्ती मानसिक आणि शारीरिक रुपात अतिशय स्वस्थ आहे. त्यामुळे आत्महत्या किंवा डुबून मरण्याची काही शक्यताच नाही. 

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) यांनी आपल्या जुन्या मुलाखतीत परदेशात राहणाऱ्या लोकांची Covert Operationच्या माध्यमातून झालेल्या हत्यांना एक राष्ट्रीय नीति म्हणून स्विकारण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मुशर्रफने म्हटलं होतं की, माझ्या डोक्यात अशा लोकांची लिस्ट आहे की, त्यांना हत्यांच्या आरोपांना सहज नाकारू शकतो. आता असे प्रश्न उभे राहत आहेत की, पाकिस्तानने मुशर्रफच्या या विचारांना आपली राष्ट्रीय नीति बनवलं आहे. 

करीमा आणि तिच्या नवऱ्याला येत होते धमकीचे फोन 

अनेक बलोच ऍक्टिविस्टचा दावा आहे की, करीमा आणि तिचा नवरा हम्माल हैदरला अनोळखी व्यक्तीचे फोन येत होते. तसेच सोशल मीडियावर गेल्या अनेक महिन्यांपासून धमकी दिली जात होते. यामध्ये व्हॉट्सऍपवर येणारे सर्व कॉल्स हे पाकिस्तानच्या नंबरवरून आले होते.